Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वर्ल्डकप: न्यूझीलंडचा श्रीलंकेवर १० गडी राखून विजय

Spread the love

भेदक गोलंदाजी आणि अप्रतीम फलंदाजीक करीत न्यूझीलंडने श्रीलंकेवर १० विकेटने मात केली आहे. श्रीलंकेने दिलेलं १३६ धावांचं लक्ष्य किवींनी १७ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर गाठलं.

सलामीवीर मार्टिन गप्टीलने ५१ चेंडूत ८ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ७३ धावांची खेळी साकारली, तर कॉलिन मुनरोने ४७ चेंडूत ६ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५८ धावांचं योगदान दिलं.

सामन्याची नाणेफेक जिंकून न्यूझीलंडने श्रीलंकेला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं होतं. न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी आपल्या अचूक माऱ्याने श्रीलंकेचा डाव नेस्तनाभूत केला. श्रीलंकेकडून दिमुथ करुणारत्ने वगळता इतर कोणताही फलंदाज खेळपट्टीवर तग धरू शकला नाही. करुणारत्नेने अखेरपर्यंत एकहाती किल्ला लढवला. पण अपेक्षित साथ न मिळाल्याने श्रीलंकेचा डाव १३६ धावांत आटोपला. न्यूझीलंडकडून मॅट हेन्री आणि लॉकी फर्ग्युसन यांनी प्रत्येकी ३ विकेट घेतल्या, तर ट्रेंट बोल्ट, कॉलिन डी ग्रँडहोम, जेम्स निशम, मिशेल सँटनर यांनी प्रत्येकी एका फलंदाजाला बाद केलं.

श्रीलंकेच्या १३६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मार्टिन गप्टील आणि कॉलिन मुनरो यांनी गोलंदाजांचा यथेच्छ समाचार घेतला. न्यूझीलंडने एकही विकेट न गमावता ९७ चेंडूत १३७ धावांचं लक्ष्य सहज गाठलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!