Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

World Cup : अफगाणिस्तानचं ऑस्ट्रेलियासमोर २०८ धावांचं आव्हान

Spread the love

अफगाणिस्तानने बलाढ्य ऑस्ट्रेलियाला विजयासाठी २०८ धावांचं आव्हान दिलं आहे. अफगाणिस्तानने सामन्याची नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेत सर्वबाद २०७ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून नजीबुल्लाह झादरान याने सर्वाधिक ५१ धावांची खेळी साकारली. तर ऑस्ट्रेलियाकडून पॅट कमिन्स आणि अॅडम झम्पा यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले.  अफगाणिस्तानच्या फलंदाची सुरुवात निराशाजनक झाली होती.

सलामीवीर मोहम्मद शेहजाद आणि हजरतुल्लाह झेजई खातंही न उघडता माघारी परतले होते. त्यामुळे अफगाणिस्तानचा ऑस्ट्रेलियासमोर काही टीकाव लागणार नाही असं चित्र निर्माण झालं होतं. मात्र, रहमत शाहने खेळपट्टीवर टीच्चून फलंदाजी करत संघाच्या धावसंख्येला सावरलं. रहमतने ६० चेंडूत ४३ धावा केल्या. यात ६ चौकारांचा समावेश आहे. रहमतला हशमतुल्लाह शाहिदी (१८) आणि गुलबदीन नायब(३१) यांनी चांगली साथ दिली. त्यांनतर नजीबुद्दीन झादराननं अर्धशतकी खेळी साकारून संघाला दोनशेचा आकडा गाठून दिला. राशीद खाननं (२७) नजीबुद्दीनला चांगली साथ दिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!