Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

बंद कंपनीत तरुणाचा मृतदेह, धड-मुंडके वेगळे करून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न

Spread the love

औरंगाबादच्या वाळूज परिसरात एक अंदाजे २२ ते २५ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. एका बंद पडलेल्या कंपनीत जमिनीत हा मृतदेह पुरण्याचा प्रयत्न करण्यात आला असून धड व मुंडके वेगळे करून त्याला जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच वाळूज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेली आहे. तर मृतदेह शवविच्छेदनासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाळूज औद्योगिक वसाहतीत पथेजा फोर्जींग नावाची कंपनी गेल्या काही वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. कंपनी बंद असल्याने परिसरातील काही लोक कंपनीच्या जागेवरील भंगार साहित्य व मुरूमाचा उपसा करून घेऊन जातात. दरम्यान आज कंपनीत काही लोक गेल्यावर त्यांना एका खड्ड्यात तरुणाचा मृतदेह दिसला. त्यांनी याची माहिती तत्काळ पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

दरम्यान, अधिक चौकशी केली असता मृतदेहाची धड आणि मुंडके वेगळे करण्यात आले आहे. तसेच मृतदेह जाळण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र मृतदेह पूर्णपणे जळाला नाही. मृतदेह असलेल्या तरुणाच्या अंगात शर्ट नसल्यामुळे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने हत्या करून, मृतदेहाची ओळख पटू नयेत आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्दिष्टाने हत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. घटनास्थळी फॉरेन्सिक लॅब व स्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. तसेच मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरु आहे. गुन्हे शाखेचे पाच आणि स्थानिक पोलिसांचे तीन असे एकूण आठ पथक मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश आघाव यांनी दिली आहे.

 

नेपाळमधील विमान दुर्घटनेत ४० जणांचा मृत्यू


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

#CrimeNews #AurangabadCrime #AurangabadNews #NewsUpdate #MahanayakOnline #MahanayakNews #MahanayakOnline

आपलं सरकार

Click to listen highlighted text!