Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : आधीच महागाई त्यात सीएनजी आणि पीएनजीच्या दारात ४० टक्केंची वाढ …

Spread the love

MaharashtraNewsUpdate : मुंबई : सणासुदीच्या काळात देशातील नागरिक कोरोनाच्या साथीनंतर कठीण आर्थिक स्थतीतीतून सावरत असतानाच आधीच पेट्रोल डिझेलच्या दरवाढीनंतर  आता वाहनांमध्ये लागणारा सीएनजी व घरगुती स्वयंपाकासाठी लागणाऱ्या पाईप नैसर्गिक वायूच्या दरात (पीएनजी) पुन्हा वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडने सोमवारी सीएनजी आणि पीएनजीच्या दरात अनुक्रमे ६ रुपये व ४ रुपयांच्या दरवाढीची घोषणा केली. याद्वारे दीड महिन्यांपूर्वी झालेली कपात पूर्ववत झाली आहे.

महानगर गॅसच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने वायूच्या दरात १ ऑक्टोबरपासून ४० टक्के वाढ केली आहे. त्याचवेळी महानगर गॅससाठीच्या वायू पुरवठा हिश्श्यात १० टक्के कपात करण्यात आली आहे. परिणामी कंपनीला महागड्या दराने बाहेरून वायू घ्यावा लागत आहे. त्यामुळेच ही दरवाढ करावी लागली आहे. त्यानुसार आता मुंबई शहर व परिसरात आता सीएनजी ८६ रुपये प्रति किलो व पीएनजी ५२.५० रुपये प्रति एससीएम असेल.

MaharashtraNewsUpdate


#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment

#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment

 

#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

For current updates join

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide

https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

आपलं सरकार

Click to listen highlighted text!