Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharshtraNewsUpdate : भारतीय बौद्ध  महासभेचे नागपुरात प्रथमच राष्ट्रीय अधिवेशन : भीमराव आंबेडकर

Spread the love

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५६ मध्ये केलेल्या धरतांतरास ६६ वर्ष पूर्ण होत असतानाच भारतीय बौद्ध महासभा आणि दीक्षाभूमी  स्मारक समितीमध्ये वाद उफाळला आहे दिक्षाभूमी परिसरात राजकीय नेत्यांना निमंत्रण देण्यावरून हा वाद उफाळला असून दिक्षाभूमी परिसर  राजकीय मंच झाल्याची टीका करीत भारतीय बौद्ध महासभेने   (दि. बुद्धिस्ट  सोसायटी ऑफ इंडिया)  येत्या ५ आकटोबर रोजी  नागपुरात प्रथमच राष्ट्रीय अधिवेशन बोलावले  आहे .


धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमास दिक्षभूमी स्मारक समितीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रामदास आठवले व  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना निमंत्रण केल्यावरून भारतीय बौद्ध महासभेने आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे   डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांनीच स्थापन केलेल्या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून    ६६  वर्षांपूर्वी  नागपूरला १४ आक्टोंबर १९५६ रोजी  दिक्षा भूमिवर केलेल्या   धम्मक्रांती मुळे देशामध्ये पून्हा बौध्द धम्माचे धम्मचक्र प्रर्वतनास सुरुवात झाली आहे. आणि त्या धम्मक्रांतीला  गौतम बुद्धांचा शांतिच्या करुणेचा, समतेचा, विचारचा देशामध्ये प्रचार आणि प्रसार होत आहे. भगवान गौतमबुद्धांची आणि डॉ. बाबासाहेबांचे विचार, बौद्ध धनाचा प्रचार प्रसार करणे हा  भारतीय बौद्ध  महासभेचा  मुख्य उद्देश्य आहे.

दीक्षाभूमीचा राजकीय मंच म्हणून वापर : भीमराव आंबेडकर

गेल्या ६६ वर्षा मध्ये  भारतीय बौद्ध  महासभा  देशभरात  विविध धम्म प्रशिक्षण शिविरे श्रामनेर शिबिरे, उपासक उपासिका शिबिरे, अशी २४ प्रकारांच्या शिबिरांचा माध्यमातून बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक निर्माण करून त्यांचा मार्फत हजारो शिलबद्ध कार्यकर्त्यांचे जाळे पसरविलेली आहे. त्यांचा माध्यमातून संपूर्ण देशातील वंचित, शोषित, ओबीसी, आदिवासी समाजाला विषमतेच्या अवस्थेतून आणण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत  मात्र नागपूरच्या दिक्षाभूमी  स्मारक समितीच्या वतीने  होत असलेले कार्यक्रम धम्माचे होतांना दिसून  येत नसून दीक्षाभूमी  राजकीय मंच झालेला आहे असा आरोप  भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष  भीमराव आंबेडकर यांनी केला आहे  त्यामुळे ६६ वर्षांनंतर प्रथमच धम्मचक्र प्रवर्तन दिनी प्रथमच  दिक्षाभूमि जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन विभागाच्या मैदानात हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन या  संस्थेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव आंबेडकर व  राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटिल यांनी केले आहे

आपलं सरकार

Click to listen highlighted text!