Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : सरसंघचालक मोहन भागवत शहरात , १५ नोव्हेंबर पर्यंत बैठकांचे सत्र

Spread the love

औरंगाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत हे महत्वाच्या बैठकीसाठी औरंगाबाद शहरात दाखल झाले असून १५ नोव्हेंबर पर्यंत त्यांचे शहरात वास्तव्य असणार आहे. औरंगाबादच्या सिडकोतील कनॉटप्लेस भागात अग्रसेन भवनात त्यांची बैठक सुरु असून याबाबत संघाकडून गुप्तता पाळण्यात येत आहे.

भागवत यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीला संघाच्या देवगिरी प्रांतातील संघाचे वरिष्ठ नेते उपस्थित आहेत. भागवत यानां झेड प्लेस सुरक्षा असल्यामुळे कनॉटप्लेस भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याचे वाहतूक शाखे कडून सांगण्यात आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातील नामदेव मंदिराला व गुरुद्वाराला भेट दिल्यानंतर जालनामार्गे ते औरंगाबाद शहरात दाखल झाले. भागवत आज ११, १२, १३, १४ आणि १५ या तारखेपर्यंत शहरात राहणार असून संघाशी संबंधित असलेल्या संस्थांच्या कामकाजाचा आढावा ते घेतील असे सांगण्यात येत आहे. सामाजिक समरसता , गोसेवा वनवासी कल्याण आश्रम, रुग्णालये, शिक्षण संस्था याच्या बाबत पुढील भूमिका काय घ्यायची आहे. यावर या बैठकीत विचार मंथन होत आहे.

दरम्यान या दौऱ्यात सरसंघचालक कुठेही माध्यमांशी बोलणार नसल्याची माहिती देवगिरी प्रांताचे संघचालक अनिल भालेराव, कार्यवाह हरीश कुलकर्णी यांनी दिली. उस्मानाबाद जिल्ह्यातील भटके विमुक्त विकास परिषद, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे व अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्यासह ६० महिला कार्यकर्त्या व भाजपचे काही कार्यकर्ते या बैठकीस निमंत्रित असल्याचे भालेराव यांनी सांगितले. १४ नोव्हेंबरला ते औरंगाबादहून विमानाने हैदराबादमार्गे कोलकात्याकडे रवाना होतील. सरसंघचालकांचा कुठलाही जाहीर कार्यक्रम होणार नसून, सर्व बैठका कोरोनाचे नियम पाळत निमंत्रित कार्यकर्त्यांसाठी असतील. १४ नोव्हेंबर रोजी संघाच्या विविध संस्था-संघटनांची समन्वय बैठक होईल. १४ रोजी गुरुवर्य लहूजी साळवे आणि
१५ नोव्हेंबर रोजी क्रांतिकारी बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम होईल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!