AurangabadCrimeUpdate : तरुणीचा खून करून फरार झालेल्या आरोपीला अटक

औरंगाबाद : राजनगर परिसरातील मोकळ्या मैदानात तरुणीचा खून करून फरार झालेल्या आरोपीला मुकुंदवाडी पोलिसांनी लोणावळ्याहून ताब्यात घेत बुधवारी पहाटे शहरात आणले. इंदू राय (२२) रा.मुकुंदवाडी असे मयत महिलेचे नाव असून एक आठवड्यापूर्वी ती एमआय मोबाईल शोरुम मधे नोकरीला लागली होती. मृत इंदूच्या गळ्यावर आवळल्याच्या खुणा होत्या . मयताचा भाऊ राहूल राय याच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान आरोपीने खुनाची कबुली दिली असून मयत इंदू त्याला फारसा भाव देत नसल्यामुळे त्यांचे वरचेवर खटके उडायचे एक आठवड्यापूर्वी इंदू ला नवी नौकरी लागली व तिच्याकडे अँड्राॅईड फोन आल्यामुळे आरोपी भोला बिथरला होता.त्यातच तिला राजनगरच्या मैदानात बोलावून तिचा गळा आवळून खून केल्याचे पोलिसांना सांगितले. वरील कारवाई पोलिस निरीक्षक मनोज पगारे यांच्या मार्दर्शनाखाली पीएसआय भराटे आणि त्यांच्या पथकाने पार पाडली.