AurangabadCrimeUpdate : फिरत्या पेट्रोल पंपासहित बायोडिझेलसह ३२ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना बेड्या

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद : समर्थनगर आणि जळगाव रोडवर दोन वेगवेगळ्या कारवायात शुक्रवारी मध्यरात्री पासून शनिवारी पहाटे दीड वाजेपर्यंत गुन्हेशाखा आणि सिडको पुरवठा निरीक्षकांसहित पोलिसांनी केलेल्या कारवाईत ३२ लाख रु.चा मुद्देमाल जप्त केला.चौघांना बेड्या ठोकल्यावरील प्रकरणी क्रांती चौक आणि सिडको पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झालेआहेत.

Advertisements

सचिन रामराव राठोड(२१) व दादासाहेब लाटे.या दोन आरोपींना गुन्हेशाकेचे एपीआय मनोज शिंदे व त्यांच्या पथकाने फिरत्या पेट्रोलपंपासहित अटक करून त्यांच्या ताब्यातून २४ लाख ९९ हजार ५४४ रु.चा मुद्देमाल जप्त केला. तर सिडको पोलिसांनी जळगावरोडवर केलेल्या कारवाईत २ हजार लिटर बायोडिझेल व तिघांना अटक केली. या मधे सलमान इस्माईल खान(२६),टेरेन्स विल्यम लोबो(२६),समशेर मेहबुब पठाण(४४) यांचा समावेश आहे.त्यांच्या ताब्यातून पिकअप व्हॅन व इतर साहात्य असा ५ लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. वरील कारवाई पोलिस निरीक्षक संभाजी पवार, विनोद सलगरकर,एपीआय अवघड,पोलिस कर्मचारी विजयानंद गवळी संतोष मुदीराज,यांचा समावेश होता.पोलिसआयुक्त डाॅ.निखील गुप्ता व पोलिसउपायुक्त दिपक गिर्‍हे यांनी अधिकार्‍यांना मार्गदर्शन केले. या सर्व प्रकरणात बायोडिझेलचा २ हजार लिटरचा साठा पोलिसांनी जप्त करून सिडको पोलिसांनी तीन जणांना अटक आहे.

Advertisements
Advertisements

कोबिंग आॅपरेशन, रेकाॅर्डवरच्या गुन्हेगारासहित एकाला घरफोडीच्या तयारीत असतांना पकडले

औरंगाबाद-आज पहाटे ५च्या सुमारास जवाहरनगर पोलिसांनी कोबिंग आॅपरेशन दरम्यान दोघांना घरफोडी करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या साहित्या सहित पकडले.

यशवंत दिपक पवळे(२४) व आकाश जाधव(२१) अशी अटक आरोपींची नावे आहेत. यापैकी यशवंत पवळे हा रेकाॅर्डवरचा गुन्हेगार आहे. त्यांच्या ताब्रातून, सुरा, वाकवलेल्या सळया,एक मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त केला. वरील कारवाई पोलिस उपायुक्त दिपक गिर्‍हे, सहाय्यक पोलिसआयुक्त रविंद्र साळोखे तसेच पोलिस निरीक्षक संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय हरिष खटावकर, पोलिस कर्मचारी डोईफौडे, सोनूने मनोज अकोले, संतोष फेपाळे यांनी पार पाडली.

आपलं सरकार