Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CrimeNewsUpdate : मराठा आरक्षणासाठी विष प्राशन करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल

Spread the love

रिक्षाचालकाने केली स्मार्ट सिटी बसचालकास मारहाण सिडको बसस्थानकासमोरील घटना

औरंंगाबाद : स्मार्ट सिटी बससमोर उभी केलेली रिक्षा बाजूला घेण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर रिक्षाचालकाने बसचालकास शिवीगाळ करून मारहाण केली. ही घटना रविवारी (दि.२४) सकाळी ७ वाजेच्या सुमारास सिडको बसस्थानकासमोर घडली. या घटनेनंतर संतप्त झालेल्या बसचालकांनी जवळपास दोन तास शहरबससेवा बंद ठेवली होती.
मुवुंâदवाडी डेपोतून रांजणगावकडे जाणारी स्मार्ट सिटी बस रविवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास सिडको बसस्थानकात प्रवासी घेण्यासाठी जात होती. त्यावेळी बससमोर अचानकपणे एक रिक्षा येऊन उभी झाली. त्यावेळी बसचालकाने रिक्षाचालकाला रिक्षा बाजूला घेण्यास सांगितले. त्यावेळी रिक्षाचालक आणि बसचालकात वाद झाला, यावेळी रिक्षाचालकाने बसचालकाला बसबाहेर ओढुन काढत शिवीगाळ करून मारहाण केली, त्यानंतर रिक्षाचालक रिक्षासह पळून गेला.
या घटनेनंतर संतप्त झालेल्या स्मार्ट सिटी बसचालक आणि वाहकांनी रिक्षाचालकांचा निषेध करीत, रिक्षाचालकावर कारवाई करण्याची मागणी करीत जवळपास दोन तास शहर बससेवा बंद ठेवली होती. दरम्यान, एस.टी.च्या अधिकाNयांनी रिक्षाचालकांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यावर स्मार्ट सिटी बसचालकांनी आपले आंदोलन मागे घेतले.

गंगापूर साखर कारखाना १५ कोटी अपहार प्रकरण महिला आरोपीची पोलिसांकडून कसून चौकशी

औरंंगाबाद : गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या १५ कोटी रूपयांच्या अपहार प्रकरणात शनिवारी सायंकाळी ग्रामीण आर्थिक गुन्हेशाखा पोलिसांनी एका महिला आरोपीला ताब्यात घेत कसून चौकशी सुरू केली. पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईमुळे कारखान्याच्या संचालक मंडळात खळबळ उडाली आहे.
गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने बनावट ठरावाच्या आधारे लासूर स्टेशन येथील बँकेत कारखान्याचे खाते उघडले. या खात्यात न्यायालयाकडून मिळालेले १५ कोटी रूपये ठेवले, त्यानंतर कारखान्याच्या सभासदांची ही रक्कम परस्पर ७ लोकांच्या खात्यावर वर्ग करून आपहार करण्यात आल्याची तक्रार १८ नोव्हेंबर २०२० रोजी कृष्णा पाटील डोणगावकर यांनी गंगापूर पोलिस ठाण्यात दिली होती. याप्रकरणी गंगापूरचे आ.प्रशांत बंब, बाबूसाहेब मुरलीधर पाटील, भीमराव भिकाजी पांडव, नारायण सोमनाथ वाकळे, कृष्णकांत भगवान व्यवहारे, पारस अमृतलाल मृथा, विद्या अजय मुनोत, मनोरमा प्रमोद काबरा, अशोक सखाराम करडे, सुयोग लालसरे, राजेंद्र गोविंद वाबळे, रामेश्वर कन्हैय्यालाल मुंदडा, शेषराव भाऊराव जाधव, गोरख लक्ष्मण तुपलोंढे, राजेंद्र राघाजी दारूंटे यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून सर्व आरोपी फरार असून मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने सर्वांचे अटकपूर्व जामीन अर्ज पेâटाळले आहेत.
दरम्यान, गंगापूर सहकारी साखर कारखान्याच्या एका संचालक महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले असल्याची माहिती मिळाल्यावर भाजपच्या एका ज्येष्ठ नेत्याने शनिवारी रात्री उशिरापर्यंत ग्रामीण पोलिस मुख्यालयात तळ ठोकला होता.

मराठा आरक्षणासाठी विष प्राशन करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल

औरंंगाबाद : मराठा समाजाला आरक्षण नसल्याने नोकरी मिळत नसल्याने नैराश्यग्रस्त झालेल्या युवकाने विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना २० जानेवारी रोजी घडली होती. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विष प्राशन करणाNया युवकाविरूध्द क्रांतीचौक पोलिस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याने एकच खळबळ माजली आहे.
गारखेडा परिसरातील शिवाजीनगर भागात राहणाNया दत्ता कचरू भोकरे (वय २६) याने मराठा आरक्षणाची सुनावणी सर्वाेच्च न्यायालयाने पुढे ढकलल्यामुळे २० जानेवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास क्रांतीचौक उड्डाणपुलाखाली विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तत्पुर्वी त्याने पेâसबुक लाईव्ह करीत मराठा समाजाला आरक्षण नसल्याने नोकरी मिळत नसल्याची खंत व्यक्त केली होती. तसेच नोकरी मिळत नसल्यामुळे मी आत्महत्या करीत असल्याचे पेâसबुक लाईव्हवरून सांगत विष प्राशन केले होते. हा प्रकार लक्षात आल्यावर मराठा आरक्षणासाठी सर्वाेच्च न्यायालयात लढा देणारे विनोद पाटील, अभिजीत देशमुख यांनी क्रांतीचौकात धाव घेत दत्ता भोकरे याला उपचारासाठी घाटीत दाखल केले होते.
दरम्यान, क्रांतीचौक पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार सुभाष चव्हाण यांनी दिलेल्या तक्रारीवरून दत्ता भोकरे याच्याविरूध्द किटकनाशक प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन पुणे करीत आहेत.

दुचाकीवर बनावट टाकणारे तिघे गुन्हे शाखेच्या जाळ्यात जमिनीच्या व्यवहारातून घेतली दुचाकी

औरंंगाबाद : जमिनीच्या व्यवहारातून दुचाकी घेत तिच्यावर बनावट क्रमांक असल्याने गुन्हे शाखा पोलिसांनी एकाला पकडले. दरम्यान, चेसीस क्रमांकावरुन पोलिसांनी मुळ मालकाचा शोध घेतला. मात्र, त्याने आपण अशी कोणतीही दुचाकी खरेदी केली नसल्याचे सांगितले. त्यावरुन तिघांविरुध्द सिडको पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकी चोरीच्या घटनांमध्ये सध्या कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाने संशयावरुन २२ जानेवारीला दुपारी चारच्या सुमारास शेख जुबेर शेख शकील, रमजान शहा यांना पकडले. त्यावेळी त्यांच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी करण्यात आली. तेव्हा जमिनीच्या व्यवहारातून ही दुचाकी ३० हजारात विकारोद्दीन अलीओद्दीन सय्यद (रा. गल्ली क्र. १०, मिसारवाडी) याच्याकडून घेतल्याचे दोघांनी सांगितले. त्यामुळे पोलिसांनी विकारोद्दीनशी संपर्क साधला. त्यावेळी त्याने आपण धुळ्याला असल्याचे सांगितले. म्हणून पोलिसांनी चेसीस क्रमांकावरुन दुचाकीचा मालक शेख इरफान शेख उस्मान (रा. जहांगिर कॉलनी) याचा शोध घेतला. तेव्हा शेख इरफान यांनी आपण आतापर्यंत अशी कोणतीही दुचाकी खरेदी केली नसल्याचे सांगितले. मात्र, कागदपत्रावर (एमएच-२०-ईझेड-६४१३) तर दुचाकीवर बनावट क्रमांक (एमएच-२०-जीझेड-६५१५) होता. त्यावरुन गुन्हे शाखेचे शिपाई विजय भानुसे यांच्या तक्रारीवरुन शेख जुबेर, रमजान शहा आणि विकारोद्दीन यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!