Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राजस्थानातील ‘त्या’ बालिकेवरील अत्याचाराचे कोडे उलगडले,रिक्षाचालक अटकेत

Spread the love

औरंंगाबाद : राजस्थानातील अल्पवयीन मुलीशी मंदीरात लग्न लावून अत्याचार करणार्‍या रिक्षाचालकाला उस्मानपुरा पोलिसांनी अटक केली आहे.

किसन रावसाहेब हिवाळे(१९) रा. मुकुंदवाडी असे अटक आरोपीचे नाव आहे.
सावत्र आई-वडिलांनी राजस्थानातील तरुणाशी विवाह लावून देण्यासाठी त्याच्याकडून दहा लाख रुपये घेत मुलीला विकले. त्यानंतर पती व त्याचे नातेवाईक मारहाण करत असल्याने राजस्थानहून सूरतला गेल्यानंतर तेथून खासगी बसने ती औरंगाबादला आली. मुकुंदवाडीरेल्वे स्टेशन परिसरात राहणार्‍या किसन हिवाळे ने तिला घरी नेले.१जानेवारी २०२१रोजी तिच्याशी मंदिरात विवाह केला. त्यानंतर त्यानेच बळजबरी अत्याचार केला. असे आतापर्यंतच्या पोलीस तपासात समोर आले आहे. त्यामुळे बालिकेवरील अत्याचाराचे कोडे आता उलगडल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.
उत्तरप्रदेशच्या मिर्झापुरातील एका १६ वर्षीय पीडीतेच्या आई-वडिलांचे तिच्या लहानपणीच निधन झाले. त्यानंतर तिला एका दाम्पत्याने दत्तक घेतले. या दाम्पत्याने सांभाळ करत गतवर्षी तिचा विवाह राजस्थानच्या बलुतरा येथील तरुणाशी लावून दिला. त्यानंतर पती व त्याच्या नातेवाईकांनी पीडीतेला मारहाण केली. म्हणून तिने शेजारी राहणा-या तरुणाने पतीच्या तावडीतून तिची सुटका केली. राजस्थानहुन औरंगाबादला आल्यावर बाबा पेट्रोलपंप येथे बसमधून उतरल्यानंतर १८ डिसेंबर ती लक्ष्मण नावाच्या व्यक्तिच्या घरी सहा दिवस राहिली. मात्र, लक्ष्मण व त्याच्या पत्नीशी वाद झाल्याने पीडीता त्याच्या घरुन मुकुंदवाडीला रागाच्या भरात निघून गेली. त्यावेळी एका अपंग व्यक्तीने पीडितेला आपल्या घरी नेले. त्यानंतर तेथे असलेल्या किसन हिवाळे ने तिला हेरले तिची ओळख करुन घेतली. त्यानंतर आरोपी हिवाळे ने पीडितेसोबत एका मंदिरात विवाह केला होता. काही दिवस त्याने चांगले वागवल्यानंतर त्याने पीडितेला मारहाण केली, त्यामुळे पीडितला त्याला सोडून रेल्वेस्टेशनवर गेली. त्यानंतर त्या तरूणाने पीडिेतेची समजूत काढुन पुन्हा त्याच्या घरी नेले. मात्र, त्याने पुन्हा शिवीगाळ केल्याने ती रेल्वे स्टेशनला आली होती.
७ जानेवारी रोजी मध्यरात्री दोन वाजेपर्यंत रेल्वे स्टेशनला थांबल्यानंतर पोलिसांनी तिला बाहेर जायला सांगितले. तेथून ती कोणाला काही न सांगता रेल्वे पटरीने पायी चिकलठाणा रेल्वे स्टेशनला गेली. ८ जानेवारीला काही जणांनी तिची विचारपूस केली. त्यानंतर रेल्वे सेनेच्या कार्यकत्र्यांनी तिला रेल्वे पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर रेल्वे पोलिसांनी विचारपूस करुन तिला उस्मानपुरा पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी या घटनेनंतर तिला उपचारासाठी घाटीत दाखल केले. दरम्यान, तिला धीर देण्यासाठी पोलिसांनी मानसोपचार तज्ज्ञांशी संपर्क साधला होता. तसेच रेल्वे स्टेशनवरील सीसी टिव्ही फुटेजमध्ये अत्याचाराचा कोणताही प्रकार पोलिसांना आढळून आलेला नव्हता.या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक दिलीप तारे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय साधना आढाव करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!