Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#CoronaVirusUpdate : LatestUpdate : औरंगाबाद शहरात 24 रुग्णांची वाढ, जिल्ह्यात 677 कोरोनाबाधित, दोन महिलांचा मृत्यू

Spread the love

औरंगाबाद शहरातील विविध भागातील 24 कोविडबाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 677 झाली आहे. नव्याने भर पडलेल्यांमध्ये 15 पुरूष आणि 09 महिला रुग्णांचा समावेश आहे, असे जिल्हा सामान्य रुग्णालय (मिनी घाटी) प्रशासनाने सांगितले आहे.


नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. औरंगाबाद शहरातील राम नगर (01), संजय नगर (02), नवयुग कॉलनी, भावसिंग पुरा(01), आरटीओ ऑफिस जवळ, पद्मपुरा (01), भुजबळ नगर, नंदनवन कॉलनी (01), वृंदावन कॉलनी, नंदनवन कॉलनी (01), नंदनवन कॉलनी (01), गगनबावडी, नंदनवन कॉलनी (02), पुंडलिक नगर, गल्ली क्रमांक दोन (02), गांधी नगर, गल्ली क्रमांक एक (01), जयभवानी नगर (01), विजय नगर, गारखेडा परिसर (01), सातारा परिसर, मनपा दवाखान्याच्या विरुद्ध दिशेला (01), एन आठ (01), रहेमानिया कॉलनी, गल्ली नं. चार (01), हुसेन कॉलनी, गारखेडा परिसर (03), घाटी परिसर (01), भडकल गेट (01), अरुणोदय कॉलनी (01) या परिसरातील आहेत, असेही मिनी घाटी प्रशासनाने सांगितले आहे.

दोन कोविडबाधित महिलांचा मृत्यू

गारखेडा परिसरातील हुसेन कॉलनी येथील 58 वर्षीय आणि बीड बायपास रोडवरील 94 वर्षीय कोविड बाधित महिलांचा काल (दि.12 मे रोजी) उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याचे घाटीचे माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी कळवले आहे. हुसेन कॉलनी येथील रुग्णास 12 मे रोजी सकाळी 10.17 वाजता कोविड संशयित म्हणून घाटीच्या अतिदक्षता विभागात गंभीर अवस्थेत भरती केले होते. ताप, खोकला, दम लागणे आदी लक्षणे त्यांना आढळून आली होती. सोबतच त्यांना मधुमेह व हायपोथयॅराडिझम हा आजार होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, 12 मे रोजी दुपारी 12.20 वा. त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्यांचा स्वॅब घेण्यात आला होता व त्यांचा कोविड अहवाल रात्री 10.30 वाजता पॉझिटिव्ह आला. तर बीड बायपास रोडवरील महिलेसही घाटीत काल (12 मे रोजी) दुपारी 4.45 वा. अतिदक्षता विभागात अतिगंभीर अवस्थेत भरती केले होते. भूक न लागणे, अशक्तपणा असल्याने त्यांना बेशुद्धावस्थेत होत्या. त्यांचाही उपचारादरम्यान 12 मे रोजी सायंकाळी पाच वाजता मृत्यू झाला. मृत्यू पश्चात त्यांचाही स्वॅब घेण्यात आला. रात्री 10.30 च्या दरम्यान त्यांचा कोविड पॉझटिव्ह अहवाल प्राप्त झाला, असल्याचे डॉ. गायकवाड यांनी कळवले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!