Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : तोतया सहाय्यक पोलिस निरीक्षकाने अनेकांना गंडविले , ४ जानेवारी पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश

Spread the love

औरंंंगाबाद : सिटीचौक पोलिसांनी गजाआड केलेल्या तोतया सहाय्यक पोलिस निरीक्षकाने अनेकांना गंडा घातला असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. अटकेत असलेल्या तोतया सहाय्यक पोलिस निरीक्षकास मंगळवारी (दि.३१) न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यास ४ जानेवारी २०२० पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
खलील खान इब्राहीम खान (वय ५५, रा. क्रांतीनगर, ता.अांबेजोगाई, जि.बीड) असे तोतया सहाय्यक पोलिस निरीक्षकाचे नाव आहे. त्याला दोन मुली व पत्नी असे कुटुंब सदस्य आहेत. गेल्या सात ते आठ वर्षांपासून तो बनावट पोलिस म्हणून मिरवतो.फक्त ८ते१०पर्यंत शिक्षण घेतलेला खलील ट्रक अडवून पैशे घेणे, धमक्या देणे असे उद्यौग करंत होता.खलील खान याचा पोलिस खात्याशी काहीही संबंध नसतांना त्याने आपल्या कार क्रमांक (एमएच-०२-सीएच-०४८९) वर पुढे आणि मागे पोलिस खात्याचा लोगो लावला होता. तसेच त्याच्या गाडीतून पोलिसांनी पोलिस लिहिलेली पाटी, पोलिसांसारखा युनिफॉर्म, पोलिस कॅप, फायबर लाठी, वेगवेगळ्या नावाचे ४ आधारकार्ड, परराज्यातील ३ मतदान ओळखपत्र, ३ विविध बँकांचे पासबूक, एक छर्‍याची बंदुक असा ऐवज सोमवारी रात्री कारवाई करून शासकीय कॅन्सर हॉस्पीटलजवळून जप्त केला.
खलील खान याने पोलिस असल्याची थाप मारून अनेकांना गंडा घातला असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणात खलील खान सोबत आणखी कोण साथीदार आहेत का याचा तपास सिटीचौक पोलिस करीत आहेत. सिटीचौक पोलिस ठाण्याचे निरीक्षक संभाजी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मौसीन सय्यद, उपनिरीक्षक ए.डी. नागरे, जमादार अप्पासाहेब देशमुख, देशराज मोरे, संतोष शंकपाळ, माजेद पटेल, त्र्यंबक दापके आदींच्या पथकाने तोतया सहाय्यक निरीक्षकास अटक करण्याची कारवाई केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!