Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

औरंगाबाद महापालिकेच्या उपमपौरपदी सेनेचे राजेंद्र जंजाळ , भाजप पुरस्कृत उमेदवाराचा पराभव

Spread the love

भाजपशी काडीमोड घेऊन शिवसेनेने महाविकास आघाडीची स्थापना करून सरकार स्थापन केल्यानंतर औरंगाबाद महापालिकेत भाजपने शिवसेनेशी काडीमोड करण्याचा निर्णय घेऊन त्यांच्याकडे असलेल्या उपमहापौर पदाचा राजीनामा दिला होता . या रिक्त जागेसाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र जंजाळ यांची महापौरपदी निवड झाली. महाविकास आघाडीच्या सत्तास्थापनेनंतर गेल्या २७ वर्षांपासून एकत्र बसणारे भाजप -सेनेचे नगरसेवक परस्परांपासून वेगळे झाले . त्याचा परिणाम म्हणून भाजपने आपल्याकडे असलेल्या उपमहापौरपदाचा राजीनामा देऊन औरंगाबाद महापालिकेतील युती संपुष्टात आणली.  महापौरांनी हा राजीनामा मंजूर करीत आज उपमहापौरपदासाठी आज मतदान घेण्यात आलं.

औरंगाबाद उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे तीनही पक्ष एकत्र आल्याने भाजपला पराभवाची धूळ चाखावी लागली. शिवसेनेच्या राजेंद्र जंजाळ यांनी शिवसेना  ५१ मते घेत विजय मिळवला. तर भाजप पुरस्कृत उमेवादाराला ३३ तर एमआयएम ला १८ मते मिळाली. या निवडणुकीत शिवसेनेने राजेंद्र जंजाळ यांना उमेदवारी दिली होती. तर त्यांच्याविरोधात भाजप पुरस्कृत उमेदवार गोकुळ मलके यांनी हि निवडणूक लढवली. एमआयएमकडून जफर बिल्डर यांना उमेदवारी देण्यात आली होती. जंजाळ यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची मिळून ५१ मतं मिळाली, तर मलकेंना ३४ आणि एमआयएमचे जफर यांना १३ मते  मिळाली. विशेष म्हणजे एमआयएमच्या २ नगरसेवकांची मते शिवसेनेचे जंजाळ यांना मिळाली , तर एका नगरसेवकाने भाजप पुरस्कृत उमेदवार गोकुळ मलके यांना मतदान केल्याचे उघड झाले. दरम्यान आपल्या उमेदवाराला मतदान करण्याचा व्हीप काढूनही  एमआयएमची मतं फुटल्यामुळे पक्षाचे खासदार वारिस पठाण यांनी पक्षाच्या उमेदवाराला मतं न देणाऱ्या ३ नगरसेवकांची हकालपट्टी केली आहे.

दरम्यान उपमहापौर निवडणुकीसाठी उशिरा आलेल्या ५ नगरसेवकांना बाहेरच उभे करण्यात आले. त्यांना मतदान प्रक्रियेपासून वंचित ठेवण्यात आल्याची माहिती आहे. उपमहापौर निवडणुकीतील मतदानासाठी उशिरा आलेल्या नगरसेवकांमध्ये भाजप २ एमआयएम १आणि २ अपक्ष नगरसेवकांचा समावेश आहे. या नगरसेवकांना मतदान प्रक्रिपासून रोखण्यात आलं आहे.

विशेष म्हणजे गेल्या २७ वर्षांपासून आमने-सामने असलेले शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आता एकाच बाजूला होते आणि एका बाजूला असणारे शिवसेना-भाजप आता आमने आले. त्यातच राज्यात महाविकासआघाडी झाल्यानंतर भाजपचे उपमहापौर विजय औताडे यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे अवघ्या ४ महिन्यांवर महानगरपालिका निवडणुका आल्या असूनही पुन्हा उपमहापौर पदाची निवडणूक घ्यावी लागली. यामध्ये अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या उमेदवाराला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला. भाजप -सेनेचे हे राजकीय वैर आगामी निवडणुकीत अधिक वाढेल असे एकूण चित्र आहे.

 

Click to listen highlighted text!