Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तरूणाचा मृत्यू , खूनाच्या गुन्ह्यात तीन अटक

Spread the love

घराला लाथ मारल्याच्या कारणावरून तीन जणांनी केलेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या २६ वर्षीय युवकाचा उपचारादरम्यान घाटी रूग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणी सातारा पोलिसांनी श्रीगोंद्याहून फरार आरोपींना बेड्या ठोकून आणले.

अनिल सिद्राप्पा फुलमाळी त्याची आई मालन(५५) आणि बायको सोनी (२४) अशी अटक आरोपींची नावे आहेत. श्रीगोंद्याला अनिल फुलमाळी च्या सासुरवाडीला तिघे मजुरी करतांना सातारा पोलिसांनी सोमवारी दुपारी ४.३० वा. ताब्यात घेऊन औरंगाबादला आणले. संतोष गुडे (वय २६, रा.बेंबडे हॉस्पीटलच्या पाठीमागे, संग्रामनगर, सातारा परिसर)धंदा किरकोळ विक्रेता असे मयत युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष गुडे हा युवक सुया, फणी, कंगवे विक्री करून आपला उदरनिर्वाह करीत होता. गेल्या काही दिवसापासून संतोष गुडे हा सातारा परिसरातील बेंबडे हॉस्पीटलच्या पाठीमागे राहत होता. संतोष गुडे याच्या घराजवळच अनिल सिन्नाअप्पा फुलमाळे (वय २५, रा.संग्रामनगर, बीड बायपास) धंदा नंदीबैल फिरवून भिक्षा मागणे हा आपल्या कुटुंबियासोबत राहत होता. ९ नोव्हेंबर रोजी रात्री दिड वाजेच्या सुमारास संतोष गुडे हा लघुशंका आल्याने उठला होता. लघुशंका करण्यासाठी जात असतांना तोल गेल्याने संतोष गुडे याचा धक्का अनिल फुलमाळे याच्या घराच्या दरवाज्याला लागला होता. त्यामुळे रागाच्या भरात असलेल्या अनिल फुलमाळे याने आई मालन आणि बायको सोनी यांच्या मदतीने संतोष गुडे याला शिवीगाळ करून लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली होती. मारहाणीत डोक्याला मार लागल्याने गंभीर जखमी झालेल्या संतोष गुडे याच्यावर घाटी रूग्णालयात उपचार सुरू होते.

दरम्यान, संतोष गुडे याच्यावर घाटीत उपचार सुरू असतांना संतोष गुडे याचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. संतोष गुडे याच्या मृत्यूस जबाबदार असणारा अनिल फुलमाळे हा आई आणि बायकोला घेऊन फरार झाला होता. सातारा पोलिसांनी त्याच्या मोबाईल लोकेशनचा शोध घेत आरोपी पकडले. पुढील तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक कराळे करीत आहेत

आपलं सरकार

Click to listen highlighted text!