Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Sangli Crime : प्रेमविवाहानंतर संसार उद्ध्वस्त; पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून केला खून

Advertisements
Advertisements
Spread the love

सांगली शहरातील विश्रामबाग परिसरात पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर पतीचा झोपेत नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बनाव रचण्यात आला होता. मात्र, मृतदेहावरील संशयास्पद जखमांमुळे पोलिसांनी केलेल्या तपासात संपूर्ण कट उघड झाला.

Advertisements

रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू

मृताचे नाव आनंद हणमंत सर्जे (वय 28, रा. पोळ मळा, सांगली) असे असून तो शहरातील एका ब्रँडेड कपड्यांच्या दुकानात सेल्समन म्हणून काम करत होता. त्यांचा प्रेमविवाह झाला होता आणि त्यांना दोन लहान मुले आहेत.

Advertisements
Advertisements

गुरुवारी पहाटे पत्नी आणि मेहुण्याने आनंदला शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्याचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

गळ्यावरील ओरखड्यांमुळे पोलिसांना आला संशय

रुग्णालयाकडून माहिती मिळताच विश्रामबाग पोलिसांनी मृतदेहाची पाहणी केली. त्यावेळी गळ्यावर ओरखडे आणि संशयास्पद खुणा आढळल्याने पोलिसांनी अधिक तपास सुरू केला.

पत्नीने सुरुवातीला पतीला मारहाण झाली होती आणि घरी झोपल्यानंतर त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले. मात्र, तिच्या जबाबात विसंगती आढळल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. त्यानंतर मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शवविच्छेदन अहवालात गळा आवळून खून झाल्याचे स्पष्ट झाले.

पत्नी आणि प्रियकराची कबुली

त्यानंतर पोलिसांनी पत्नी आणि तिच्या 23 वर्षीय प्रियकराला ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.

प्राथमिक चौकशीत, आनंद दारूच्या नशेत पत्नीला वारंवार मारहाण करत होता, शिवीगाळ करून मानसिक व शारीरिक त्रास देत होता. याच कारणातून दोघांनी खुनाचा कट रचल्याचे समोर आले आहे.

छातीवर बसून गळा आवळून हत्या

गुरुवारी पहाटे पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला. त्यानंतर पत्नीने प्रियकराला घरी बोलावले. दोघांनी मिळून आनंदचे पाय ओढणीने बांधले आणि त्याच्या छातीवर बसून गळा आवळत त्याचा खून केला. त्यानंतर नैसर्गिक मृत्यू झाल्याचा बनाव करून त्याला रुग्णालयात नेण्यात आले.

गुन्हा दाखल; पुढील तपास सुरू

या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी मृताची पत्नी आणि तिच्या प्रियकराविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून दोघांनाही ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 

मुंबईत मोठा घातपाताचा कट उधळला? मोहरम मिरवणुकीत विषारी कॅप्सूल वाटणारा फय्याज प्रेमजी अटकेत; दहशतवादी अँगलने तपास

Sangli Crime News, Wife Killed Husband, Vishrambag Murder Case, Sangli Murder, Maharashtra Crime News

 

Leave a Reply

आपलं सरकार

Click to listen highlighted text!