Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

’यूपीएनं दहशतवादी कसाबला बिर्याणी दिली पण आम्ही सर्जिकल स्ट्राईक केले , जेपी नड्डांचा काँग्रेसवर घणाघात

Advertisements
Advertisements
Spread the love

ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी ठाण्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि आघाडी सरकारवर जाेरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केलेल्या कामांचं त्यांनी काैतुक केलं. ’’आघाडी सरकारनंच दहशतवादी कसाबला बिर्याणी खावू घातली हाेती,’’ असा आराेप जेपी नड्डा यांनी तत्कालीन यूपीए सरकारवर केला.

ठाण्यात विधानसभा निवडणुकीचं वातावरण चांगलंच रंगलंय. भाजपाचे ठाणे शहर विधानसभेचे उमेदवार संजय केळकर हे तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. संजय केळकर यांच्या प्रचारासाठी भाजपाचे राष्ट्रीय नेते ठाण्यात हजेरी लावत आहेत. प्रचारासाठी शुक्रवारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा ठाण्यात आले हाेते.
यूपीएनं कसाबला बिर्याणी दिली : ’’यूपीए सरकारच्या काळातच मुंबईत 2611 दहशतवादी हल्ला झाला हाेता. यूपीए सरकार पाकिस्तानात जात हाेतं. तसंच त्यांनीच दहशतवादी कसाबला बिर्याणी दिली हाेती. पण उरीमध्ये घडलेल्या दहशतवादी हल्ल्याला आम्ही 15 दिवसात प्रत्युत्तर दिलं. दहशतवादी हल्ला झाल्याच्या 15 दिवसांतच पंतप्रधान नरेंद्र माेदींनी पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केलं. पुलवामा विषयावर पाकिस्तानला एक शब्दही काढता आला नाही. पण इथे आपल्याच देशातील काँग्रेसचे नेते पुरावे मागत हाेते,’’ असा घणाघात जेपी नड्डा यांनी काँग्रेसवर केला.

Advertisements

ठाण्यातील गुरुद्वारामधून नड्डा यांना बाहेर काढलं?

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी जेपी नड्डा ठाण्यात आले हाेते. ठाण्यातील गुरुद्वारामधून नड्डा आणि ठाणे शहर विधानसभेचे भाजपाचे उमेदवार संजय केळकर यांना बाहेर काढण्यात आल्याचं व्हि.डिओत दिसत आहे. ’’गुरुद्वारामध्ये माेठया प्रमाणात भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी झाली हाेती. त्यात गुरुनानक जयंतीनिमित्तानं धार्मिक कार्यक्रम सुरू हाेते. या गर्दीमुळं कार्यक्रमात अडचण निर्माण झाली हाेती,’’ अशी माहिती तेथील सेवेकरयांनी दिली. ’’हा प्रकार म्हणजे प्रार्थनेमध्ये झालेला भंग आहे. यातूनच सर्वच राजकीय पक्षांनी बाेध घेतला पाहिजे. धार्मिक स्थळाला जाताना तिथले नियम पाळले पाहिजेत,’’ अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी दिली. दरम्यान, यावर भाजपाकडून अजून काेणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!