Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भरारी पथकाची कारवाई, 546 काेटींची मालमत्ता जप्त; राेकड, माैल्यवान वस्तूंसह साेने-चांदी ताब्यात

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : राज्यातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भरारी पथकाकडून आत्तापर्यंत माेठी रक्कम जप्त करण्यात आली आहे. अवैध मार्गाचा पैसा किंवा बेहिशाेबी मालमत्ता निवडणूक स्थिर पथके, पाेलीस यंत्रणा व भरारी पथकाने जप्त केली आहेत. त्यानुसार, गेल्या महिनाभरात 546 काेटी 84 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. तर, विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी 15 ऑक्टाेबर ते 15 नाेव्हेंबर 2024 दरम्यान राज्यभरात सी-व्हिजिल अ‍ॅपवर एकूण 7 हजार 400 तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी 7 हजार 360 तक्रारी निवडणूक आयाेगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिली आहे. दरम्यान, पुढील 4 दिवसांत निवडणूक प्रचारसभांची सांगता हाेईल, त्यानंतरीही आदर्श आचारसंहिता लागू असणार आहे.

राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी 15 ऑक्टाेबरपासून बेकायदा पैसे, दारू, अमली पदार्थ, माैल्यवान धातू आदींच्या विराेधात केलेल्या कारवाईत एकूण 546 काेटी 84 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे, राज्यभर आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याचे पाहायला मिळते. आता निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला असून पुढील काही दिवसांत प्रचारांची सांगता हाेणार आहे. त्यानंतर, 20 नाेव्हेंबर राेजी राज्यात महाराष्ट्रातील 288 मतदारसंघात मतदान हाेऊन 23 नाेव्हेंबर राेजी निकाल जाहीर केला जाईल. मात्र, निवडणूक निकालाच्या तारखेपर्यंत राज्यात आदर्श आचारसंहिता सुरूच राहणार आहे. त्यामुळे, 23 नाेव्हेंबरपर्यंत आचारसंहिता भंग संदर्भात नागरिकांना, उमेदवारांना आणि इतरांनाही आचारसंहिता भंगबाबत तक्रार देता येईल.

Advertisements

अमरावतीत 5 काेटींचे दागिनेसह वाहन जप्त

दरम्यान, मुंबई, पुणे, भिवंडी, ठाणे यांसह मराठावाड्यातही पाेलिसांकडून माेठ्या प्रमाणात राेकड जप्त करण्यात आली आहे. तर, शुक्रवारीच अमरावतीत पाेलिसांनी 5 काेटी रुपयाचं साेने-चांदी घेऊन जाणारं वाहन केलं जप्त हाेतं. त्याबाबत शहरातील नागपुरी गेट पाेलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. मात्र, सिक्वेल लाॅजीस्टिक नागपूर यांच ते वाहन असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे वाहन नागपूरवरुन साेने आणि चांदीचे दागिने घेऊन विविध जिल्ह्यात वितरण करत असते. विशेष म्हणजे हेच वाहन तिवसामध्ये सुद्धा काही दिवसांपूर्वी पकडले हाेते. त्यावेळी 64 किलाे साेने आणि चांदीचे दागिने हाेते, पण तीन दिवसानंतर ते वाहन साेडून देण्यात आले हाेते.

Advertisements
Advertisements

अ‍ॅपवरुन करता येईल तक्रार

सी-व्हिजिल अ‍ॅपद्वारे नागरिक आचारसंहितेच्या उल्लंघनाबाबत तक्रार दाखल करू शकतात. हे अ‍ॅप काेणत्याही अ‍ॅपस्टाेअरमधून डाउनलाेड करता येते. तक्रार दाखल झाल्यानंतर संबंधित पथकाद्वारे चाैकशी करुन याेग्य ती कारवाई करण्यात येते.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!