Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी नक्षलवाद व आतंकवाद मुक्त देश करण्याचे काम केले : अमित शाह

Spread the love

चंद्रपूर : गडचिराेलीतील नक्षलवाद समुळ समाप्त करण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले. राम मंदिर निर्माणासाेबतच कलम 370, तीन तलाक, सीएए लागू केला आहे. माेदी सरकारने महाराष्ट्राला 15 लाख 10 हजार कराेड रूपयांसह विकासाचे विविध प्रकल्प दिले आहेत. आता लवकरच वक्फ कानून बदलण्याची तयारी सुरू आहे. काॅग्रेस, शिवसेना उध्दव ठाकरे तथा राष्ट्रवादीचे शरद पवार यांचा या सर्व गाेष्टींना विराेध हाेता अशी टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. दरम्यान, महाराष्ट्रात महायुती सरकार निवडून देऊन माेदींचे हात मजबूत करण्याचे आवाहन केले.

स्थानिक चांदा क्लब ग्राऊंड येथे जिल्ह्यातील भाजपाच्या सहा उमेदवारांच्या प्रचारार्थ गृहमंत्री अमित शाहा यांची सभा झाली. यावेळी मंचावर बल्लारपुर मतदार संघाचे उमेदवार वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, चंद्रपूरचे आमदार किशाेर जाेरगेवार, वराेराचे करण देवतळे, राजुराचे देवराव भाेंगळे, मागासवर्गीय आयाेगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा उपस्थित हाेते. चंद्रपुरकरांना नमस्कार करित व मी तुमच्या साेबत केवळ पाच मिनिट आहे मला माफ करा असे म्हणत अमित शहा यांनी भाषणाला सुरूवात केली.

औरंगाबादला छत्रपती संभाजी नगर, उस्मानाबादच्या धाराशीव. तसेच अहिल्यानगर या नामांतरणाला काॅग्रेस, ठाकरे व पवार यांनी विराेध केला. पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी नक्षलवाद व आतंकवाद मुक्त देश करण्याचे काम केले आहे. गडचिराेली सारख्या नक्षलग्रस्त जिल्ह्यात माेदी सरकारने नक्षलमुक्त केला आहे. छत्तीसगडमध्ये काही प्रमाणात शिल्लक असलेला नक्षलवाद 31 मार्च 2026 पर्यंत समाप्त करू अशीही घाेषणा शहा यांनी केली. माेदींनी देशाला समृध्द केले आहे. जगात देशाचा सन्मान वाढविला आहे. केंद्रातील माेदी सरकारने 15 लाख 10 हजार काेटींसह महाराष्ट्रात विविध प्रकल्प दिले आहेत. याउलट आघाडीने केवळ 3 लाख 91 हजार कराेड विकासनिधी दिला अशीही तुलनात्मक टिका केली. युती सरकारला निवडून दिल्यास महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्याने घालविलेले वैभव येत्या पाच वर्षांमध्ये परत मिळवून देणार असेही शहा म्हणाले.

महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मार्गांवर जाणारी सरकार पाहिजे कि, औरंगजेब गॅंग सरकार पाहिजे हे आता तुम्हीच ठरवा असेही शहा म्हणाले. यावेळी माेदी यांनी राज्यात महायुतीची सरकार निवडून देवून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचे हात मजूत करण्याचे आवाहन केले. याप्रसंगी बल्लारपुरचे उमेदवार वनमंत्री सुधीर मुनंटीवार यांनी मार्गदर्शन करतांना जिल्ह्यात केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला. काॅग्रेस धृतराष्ट्र आहे अशीही टिका केली. तर चंद्रपुरचे उमेदवार आमदार किशाेर जाेरगेवार यांनीही महायुतीचे सर्व सहाही उमेदवार निवडुन दिल्यास जिल्ह्याचा समृध्द विकास हाेईल असे सांगितले.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची 4 वाजता सुरू हाेणारी सभा तब्बल 45 मिनिटे उशिराने सुरू झाली. त्यामुळे शहा केवळ पाच मिनिटांमध्ये आपले मनाेगत व्यक्त करून परत गेले. शहा चंद्रपुरकरांसाठी माेठी घाेषणा करेल अशी अपेक्षा सर्वांना हाेती. मात्र, तसे काहीच झाले नाही. दरम्यान शहा आले आणि निघून गेले त्यामुळे भाषण ऐकण्यासाठी आलेल्यांची घाेर निराशा झाली. त्याचा परिणाम सभास्थळी दिसत हाेता. विशेष म्हणजे, शहा यांनी सभास्थळ साेडताच अवघ्या पाच मिनिटात सर्वजण निघून गेल्याने सभास्थळ व खुर्चा खाली दिसत हाेत्या. शहा सभेला आले तेव्हाही बहुसंख्य खुर्चा खालीच हाेत्या. शहांच्या पाच मिनिटांच्या भाषणाने सर्वत्र नाराजीचा सूर उमटला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!