Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वोट जिहाद होत असेल, तर मतांचे धर्मयुद्ध आपल्यालाही लढावं लागेल , देवेंद्र फडणवीस आक्रमक

Spread the love

ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रमुख सज्जाद नोमानी यांच्या व्हिडिओवर आक्रमक प्रतिक्रिया ….

मुंबई : ऑल इंडिया पर्सनल लॉ बोर्डाचे प्रमुख सज्जाद नोमानी यांनी युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर करत महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला समर्थन जाहीर केलं आहे. या व्हिडीओ नंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. भाजपाच्या नेत्यांनी हा एकप्रकारे वोटजिहाद असल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या व्हिडीओवरून विरोधकांना लक्ष्य केलं आहे.

आज खडकवासला येथे भाजपा उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी भर सभेत सज्जाद नोमानी यांचा व्हिडीओ ऐकवत महाविकास आघाडीवर टीकास्र सोडलं. महाविकास आघाडीच्या विजयासाठी वोट जिहादचा नारा दिला जातो आहे. या वोट जिहादचे मुख्य सुत्रधार कोण? हे आताच तुम्ही ऐकलं. मतांसाठी महाविकास आघाडीचे नेते मुस्लिमांची तवळे चाटत आहेत. हे लोक सांगतात, की आम्ही दंगेखोरांना सोडून देऊ. या ठिकाणी वोटजिहाद होत असेल, तर मतांचे धर्मयुद्ध आपल्यालाही लढावं लागेल. आता आपण एक राहलो, तरच सेफ ( सुरक्षित) राहू, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

काही लोकांचा हेतू फक्त महाराष्ट्रात भाजपाचा पराभव करणं नाही, तर दिल्लीतील भाजपाचे सरकार पाडणंसुद्धा आहे. या देशाला अस्थिर करण्याचं काम हे लोक करत आहेत. यात आता महाविकास आघाडीचाही समावेश झाला आहे. त्यामुळे ही निवडणूक तुमची निवडणूक आहे. ही पुढच्या पिढ्यांसाठीची निवडणूक आहे. आता जर तुम्ही जागे झाला नाहीत, तर नंतर याचे परिणाम भोगावे लागतील, त्यामुळे मी तुम्हाला जागं करण्यासाठी आलो आहे. जर तुमच्या पुढच्या पिढ्या सुरक्षित करायच्या असतील, तर कमळाच्या चिन्हावरील बटन दाबून भाजपाला विजयी करा आणि यांचे नापाक हेतू उधळून लावा, असं आवाहनही देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

सज्जाद नोमानी नेमकं काय म्हणाले?

सज्जाद नोमानी यांच्या अधिकृत युट्यूब चॅनेलवर सदर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. १६ मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये सज्जाद नोमानी यांनी मुस्लीम समाजाला योग्य मतदान करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणतात, “मी हे निश्चित सांगू शकतो की, महाराष्ट्राच्या निवडणुकीला आता मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. जर इथे हरियाणाप्रमाणेच त्यांचा (भाजपा) विजय झाला तर त्यांचा आत्मविश्वास आणखी मजबूत होईल. त्यानंतर दिल्ली सरकार नव्या आत्मविश्वासाने आपल्या वाईट हेतूंच्या दिशेने मार्गक्रमण करेल. जर महाराष्ट्रात त्यांचा (भाजपाचा) पराभव झाला, दिल्लीमधले त्यांचे सरकार अधिक काळ टीकू शकणार नाही. त्यामुळे आपल्या निशाण्यावर फक्त महाराष्ट्राचे सरकार नाही, तर दिल्लीही आहे.”

आपलं सरकार

Click to listen highlighted text!