Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मनाेज जरांगेंच्या प्रकृती स्थिर , अंतरवालीत डाॅक्टर पाेहाेचले….

Advertisements
Advertisements
Spread the love

जालना : विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पाेहाेचला आहे. सत्ताधारी आणि विराेधकांमध्ये जंगी सामना सुरू आहे. तर उमेदवारांना पाडणार अशी गर्जना करणारे मराठा आंदाेलक मनाेज जरांगे यांच्या तब्येतील बातमी समाेर आली आहे. अचानक जरांगे यांची प्रकृती बिघडली आहे.

मनाेज जरांगे यांची प्रकृती अचानक खालावली आहे. जालन्याच्या अंतरवाली सराटी गावात मनाेज जरांगे यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहे. अशक्तपणा जाणवत असल्याने जरांगे यांच्यावर सलाईनद्वारे उपचार करण्यात येत आहेत. मनाेज जरांगे यांना गुरुवारी हलका ताप देखील जाणवत हाेता.

Advertisements

दरम्यान, आज जरांगे यांना अशक्तपणा जाणवत असल्याने त्यांच्यावर अंतरवाली सराटी येथील सरपंचांच्या निवासस्थानी उपचार करण्यात येत आहेत. अंतरवाली सराटी गावात केलेल्या सततच्या आमरण उपाेषणामुळे जरांगे यांची प्रकृती खराब झाली आहे. त्यांच्यावर उपचार सध्या सुरू आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान, मनाेज जरांगे पाटील यांनी गुरुवारी पत्रकारांशी बाेलत असताना महायुतीवर टीकास्त्र साेडले हाेतं. मनाेज जरांगे पाटील यांनी बटेंगे ताे कटेंगे’ आणि ’एक है ताे सेफ है’ या घाेषणांवरही टीका केली. आम्ही छत्रपती शिवरायांचे हिंदुत्व मानताे. मराठे ही हिंदूमधील माेठी जात असून आमचे आम्ही पाहून घेऊ, असे मनाेज जरांगे यांनी म्हटलं.

’जे लाेक हिंदू खतरे में म्हणतात, त्यांना मराठ्यांची आरक्षण लढ्यातील एकजूट दिसत नाही का, असा प्रश्न केला. ’बटेंगे ताे कटेंगे’ आणि ’एक है ताे सेफ है’ ही दाेन्ही घाेषवाक्ये काेणासाठी आहेत असे विचारताना मराठा ही हिंदूमधील माेठी जात आहे. तेव्हा आम्ही आमचे बघून घेऊ. आम्ही शिवछत्रपतींचे हिंदूत्व मानताे, असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले. मुस्लिमांविराेधात मराठा समाजाच्या हातात लाठ्या देऊन त्यांचा वापर केला जात असल्याचा आराेप जरांगे यांनी केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!