Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पाकिस्तानी समजून हवाई दलाने आपलेच हेलिकॉप्टर पाडले , निवृत्त कर्नलचा खळबळजनक आरोप

Advertisements
Advertisements
Spread the love

तपासणी अहवाल निवडणुकीआधी जाहीर न करण्याचा दबाव : हवाई दलाकडून मात्र आरोपांचे खंडन

बालाकोट हल्ल्याच्या एकदिवसानंतर बडगाम येथे भारताच्या हेलिकाॅप्टरचा अपघात झाला होता. यात 6 भारतीय पायलटचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी संरक्षण तज्ञ आणि निवृत्त कर्नल अजय शुक्ला यांनी खळबळजनक आरोप केला आहे.

Advertisements

दरम्यान, भारताच्या हवाई दलाने अजय शुक्लांच्या दाव्याचे खंडन केले असून या दुर्घटनेचा तपास सुरु असल्याचं म्हटलं आहे.

Advertisements
Advertisements

हेलिकाॅप्टरच्या अपघातात भारतीय हवाईदलाची चूक असल्याचा दावा त्यांनी केला आहे. भारताच्या हवाईदलाने पाकिस्तानचे हेलिकाॅप्टर समजून आपलेच हेलिकाॅप्टर पाडल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

‘कोर्ट ऑफ इन्क्वायरी’ करणाऱ्याचा अधिकाऱ्यांना तपासाचा अहवाल निवडणुकीच्या आधी प्रसिद्ध न करण्यासाठी दबाव आणला जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!