Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Loksabha 2019 Live : राज्यात चौथ्या टप्प्यात ५७ टक्के मतदान

Spread the love

देशासह राज्यात चौथ्या टप्प्यातील मतदान आज पार पडले. राज्यात चौथ्या टप्प्यासाठी एकूण ५७ टक्के मतदान झाले तर चारही टप्प्यांचे मिळून एकूण ६१ टक्के मतदान झाले. यामध्ये गडचिरोलीत सर्वाधीक ७२ टक्के मतदान झाले तर सर्वात कमी कल्याणमध्ये ४४ टक्के मतदान झाले. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. २०१४ प्रमाणे यंदाही मतदान झाल्याचे यावेळी आयोगाने सांगितले.

आयोगाच्या माहितीनुसार, चौथ्या टप्प्यात मुंबई, नाशिक आणि मावळमध्ये भरभरुन मतदान झाले. तर कल्याणमध्ये मतदारांनी निराशा केली. मुंबई-पुण्यासारख्या शहरी भागात सेलिब्रेटींनी उत्साहात मतदान केले. राज्यात चौथ्या टप्प्यात २५ ठाणे हा सर्वात मोठा मतदारसंघ होता. यामध्ये २१ लाख ६० हजार मतदार होते. तर दक्षिण मुंबई हा सर्वात छोटा मतदारसंघ होता. यामध्ये १४ लाख ४० हजार मतदार होते.

राज्यात चारही टप्प्यातील मतदान प्रक्रियेसाठी ७ लाख ५० हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. सुरक्षेच्या कारणास्तव १ लाख ४ हजार पोलीस नियुक्तीवर होते. अशा प्रकारे एकूण साडे आठ लाख कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. निवडणूक काळात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी १७,५०० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर १५७ कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

महाराष्ट्रात दुपारी तीन वाजेपर्यंत १७ मतदारसंघांमध्ये झालेल्या मतदानाची टक्केवारीः

नंदुरबार- ५१.९६, धुळे- ४०.६३, दिंडोरी- ४६.१३, नाशिक- ४१.७२, पालघर- ४६.७७, भिवंडी- ३९.३५, कल्याण- ३३.७७, ठाणे- ३८.५२, मुंबई उत्तर- ४४.६५, मुंबई उत्तर पश्चिम- ४०.५३, ईशान्य मुंबई- ४३.१२, मुंबई उत्तर मध्य- ३९.८४, मुंबई दक्षिणमध्य- ४१.०९, मुंबई दक्षिण- ३८.७६, मावळ- ४२.३२, शिरूर- ४१.४८, शिर्डी- ४५.४८

सिद्धार्थ खरात,सहसचिव उच्च व तंत्रशिक्षण आणि डॉ. सुवर्णा खरात, सहसचिव शालेय शिक्षण यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

पुणेः उद्योगपती राहुल बजाज यांनी आकुर्डी येथील गोदावरी हिंदी माध्यमिक शाळेत केले मतदान

अभिनेत्री अमृता खानविलकरनं बजावला मतदानाचा हक्क

जळगावः धुळे लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत ४०.५१% मतदान पार पडले

नाशिकः नाशिक मतदारसंघात तीन वाजेपर्यंत ३९.८५% मतदान झाले.

अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांनी मुंबईतील वांद्रे येथे बजावला मतदानाचा हक्क

डहाणू – विधानसभा मतदारसंघातील चिखले गावात आईला मुखाग्नी देऊन मुलांनी बजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्रात दुपारी तीन वाजेपर्यंत ४२.०३ टक्के मतदान

पालघर लोकसभा मतदार संघात तीन वाजेपर्यंत सुमारे ४६.४४ टक्के मतदान

भिवंडी लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत ३९.३५ टक्के मतदान

कल्याण लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत केवळ ३३.०७ टक्के मतदान

ठाणे लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत ३६.०७ टक्के मतदान

शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये दुपारी तीन वाजेपर्यंत ४० टक्के मतदान

शिर्डी मतदारसंघात दुपारी ३ वाजेपर्यत ४७ टक्के मतदान

नंदुरबार लोकसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत ४९.३९% मतदान

राज्यातील १७ मतदारसंघातून ईव्हीएमसंदर्भात एकूण ३० तक्रारी

नाशिकमधील काही मतदान केंद्रात मोबाईल फोनचा वापर करून मतदाराने मतदान करताना शूटिंग केले, निवडणूक अधिकाऱ्यांनी  संबंधित मतदाराला रंगेहात पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

नाशिक शहर व परिसरात कर्मचाऱ्यांनी काही मतदान केंद्रावर घेतला लंच ब्रेक घेत 20 ते 30 मिनिटे मतदान प्रक्रिया बंद.

धुळे – नंदुरबार लोकसभा मतदारसंघात साक्री तालुक्यातील चारणकुडी येथील ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार

मुख्य सचिव यूपीएस मदान यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला

नगरमधील श्रीरामपूर येथे ४२ तृतियपंथीयांनी बजावला मतदानाचा हक्क

शिर्डी लोकसभा मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.५६ % मतदान

उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत २८ % मतदान

शिरूर लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत २४% मतदान

धुळे लोकसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत सुमारे २९.७५% मतदान

नाशिक : खासदार हेमंत गोडसे यांनी बजावला मतदानाचा हक्क

अभिनेत्री करिना कपूर हिने मुंबईत बजावला मतदानाचा हक्क

अभिनेता सलमान खान याने मुंबईतील वांद्रे येथे बजावला मतदानाचा हक्क

महाराष्ट्रात दुपारी एक वाजेपर्यंत ३१.७४ टक्के मतदान

मुंबई: काँग्रेसच्या उत्तर मध्य मतदारसंघाच्या उमेदवार प्रिया दत्त यांनी वांद्र्यात केलं मतदान

मुंबई: जावेद अख्तर, शबाना आझमींनी केलं मतदान

मुंबई: अभिनेत्री आणि भाजपाच्या उमेदवार हेमा मालिनी यांनी मुलींसह केलं मतदान

मुंबई: ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

दुपारी २ पर्यंत ३८.६३% मतदान; पश्चिम बंगालची जोरदार आघाडी

दुपारी दोनपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी- बिहार ३७.७१, मध्य प्रदेश- ४३.४४, महाराष्ट्र- २९.९४, ओडिशा- ३५.७९, राजस्थान- ४४.६२, उत्तर प्रदेश-३४.४२, पश्चिम बंगाल- ५२.३७, झारखंड- ४४.९०

महेंद्र ग्रुपचे अध्यक्ष आनंद महिंद्रांनी केले मतदान

एचडीएफसी कंपनीचे अध्यक्ष दिपक पारेख यांनी बजावला मतदानाचा हक्क

अभिनेत्री कंगना रणौतने बजावला मतदानाचा हक्क

उद्धव ठाकरे यांचे सहकुटुंब मतदान

अमिताभ बच्चन यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला

सचिन तेंडुलकरने सहकुटुंब केले मतदान.

राज ठाकरे पावणे दोन तास मतदानाच्या रांगेत

मुंबई: अभिनेत्री दिया मिर्झा हिने बजावला मतदानाचा हक्क.

मुंबई: अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने विलेपार्ले येथे केले मतदान.

काँग्रेसचे उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील उमेदवार संजय निरुपम यांनी केले मतदान.

मुंबई: निर्माता, दिग्दर्शक महेश भट्ट यांनी बजावला मतदानाचा हक्क, केले मतदान करण्याचे आवाहन.

मुंबई: बोरीवली, डोंबिवलीत मतदान खोळंबले ! ठिकठिकाणी ईव्हीएम बंद पडत असल्याच्या तक्रारी.

सकाळी 10 पर्यंत 10.42 टक्के मतदान; महाराष्ट्र- 6.66%, बिहार- 10.76%, मध्य प्रदेश- 11.45%, ओडिशा- 8.34%, राजस्थान- 12.22%, उत्तर प्रदेश- 9.87%, पश्चिम बंगाल 16.90%, झारखंड-12%

मुंबई: अभिनेत्री भाग्यश्री, सोनाली बेंद्रे यांनी विलेपार्ल्यात बजावला मतदानाचा हक्क

दिल्ली- पश्चिम बंगालमधील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भाजपाचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाची भेट घेणार

#पहिल्या दोन तासात झालेले मतदान 
6.82 जागा हाराष्ट्र (17 seats), 11.11% मध्यप्रदेश (6 जागा ) ,9% ओरिसा (6) 16.90% पश्चिम बंगाल (8 जागा )

नंदुरबार- ९%, धुळे- ६%, दिंडोरी- ७%, नाशिक- ७%, पालघर- ८%, भिवंडी- ६%, कल्याण- ५%, ठाणे- ७%, उत्तर मुंबई- ८%, उत्तर पश्चिम मुंबई- ७%, ईशान्य मुंबई- ७%, उत्तर मध्य मुंबई- ६%, दक्षिण मध्य मुंबई- ७%, मावळ- ७%, शिरुर- ७%, शिर्डी- ७%

पश्चिम बंगाल: तृणमूल आणि भाजपा कार्यकर्ते आमनेसामने

पश्चिम बंगाल: भाजपा उमेदवार बाबुल सुप्रियो यांच्या गाडीची आसनसोलमध्ये तोडफोड

माधुरी दीक्षित यांनी बजावला मतदानाचा हक्क

मुंबई: आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पेडर रोडवर बजावला मतदानाचा हक्क

मध्य प्रदेश: मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शिकारपूरमध्ये बजावला मतदानाचा हक्क

राजस्थानमध्ये माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेत्या वसुंधरा राजे यांनी मतदान केले.

बिहार: सीपीआयचा बेगुसरायमधील उमेदवार कन्हैया कुमार याने बजावला मतदानाचा हक्क.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, जावई सुळे आणि सुप्रिया सुळेंच्या कन्येने बजावला मतदानाचा हक्क.

नाशिक: वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांनी बजावला मतदानाचा हक्क.

ठाणे: राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आनंद परांजपे यांचे बेडेकर शाळेत मतदान.

मुंबई: भारतीय जनता पक्षाचे खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी विलेपार्ले येथील जमनाबाई विद्यालयात बजावला मतदानाता हक्क.

ईशान्य मुंबईतील भाजप उमेदवार मनोज कोटक यांनी बजावला मतदानाचा हक्क.

अभिनेत्री प्रियांका चोप्राने बजावला मतदानाचा हक्क.

राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सहकुटुंब बजावली मतदानाचा हक्क.

काँग्रेसच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी बजावला मतदानाचा हक्क.

ठाणे: ज्येष्ठ संशोधक, अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी एलआयसी मंडल मतदान केंद्रात बजावला मतदानाचा हक्क.

मुंबई: रिझर्व बँक ऑफ इंडियाचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी पेडर रोडवरील मतदान केंद्रावर केले मतदान.

भोजपुरी अभिनेते रवी किशन यांनी मुंबईतील गोरेगावात केलं मतदान; रवी किशन उत्तर प्रदेशातील गोरखपूर मतदारसंघातून लढवताहेत निवडणूक

मुंबई: अभिनेत्री रेखा यांनी वांद्रे येथील मतदान केंद्रांवर केलं मतदान

मुंबई: उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार पूनम महाजन यांनी वरळी येथे केलं मतदान

पुणे: मावळ मतदारसंघात मतदानाला सुरुवात; विविध संस्था, संघटनांकडून १०० टक्के मतदान करण्याचे आवाहन

नाशिक लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पवन पवार यांनी सपत्नीक केलं मतदान

मुंबई: उद्योगपती अनिल अंबानी यांनी कफ परेड येथील मतदान केंद्रावर बजावला मतदानाचा हक्क

तुमचं मत लोकशाही बळकट करेल; केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचं ट्विट

चौथ्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं ट्विट; तरुणांना भरघोस मतदान करण्याचं आवाहन

सर्वत्र कडेकोट बंदोबस्त

लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचं आज मतदान होत आहे. यात महाराष्ट्रातल्या 17 जागांचा समावेश असेल. यात मुंबईतल्या सर्व जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रातल्या मतदानाचा हा शेवटचा टप्पा आहे.

लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदान आज देशात होत आहे. एकूण 9 राज्यांतील 71 जागांवर मतदार आपलं बहुमुल्य मत नोंदवणार आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील 17 जागा, उत्तर प्रदेश-राजस्थानातील प्रत्येकी 13-13 जागा, पश्चिम बंगालमधील 8 जागा, मध्य प्रदेश-ओडिशातील 6-6 जागा, बिहारमधील 5 जागा, झारखंडतील 3 जागा आणि जम्मू काश्मीरमधील एका जागेचा समावेश आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!