Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पश्चिम बंगालमध्ये हिंसा, बाबुल सुप्रियोंची कार फोडली, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या घाबरल्या आहेत : बाबुल सुप्रियो

Spread the love

पश्चिम बंगालच्या आसनसोल मतदारसंघात ईव्हीएम मशीनमध्ये गडबड झाल्याने तृणमूल काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले असून प्रक्षुब्ध जमावाने केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्या गाडीच्या काचा फोडल्या आहेत. त्यामुळे या जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार केल्याने या परिसरात तणाव निर्माण झाला आहे.  लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील ८ जागांसाठी पश्चिम बंगालमध्ये मतदानाला सकाळी सुरुवात झाली. मतदान सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार झाल्याचं वृत्त पसरलं.

आसनसोल लोकसभा मतदारसंघातील पांडाबेश्वर विधानसभा मतदारसंघातही ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार झाल्याचं वृत्त पसरल्याने भाजप आणि टीएमसी कार्यकर्त्यांनी मतदान केंद्राबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते एकमेकांशी भिडले. हा प्रकार कळल्यानंतर केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र त्यांना प्रक्षुब्ध जमावाच्या रोषाला सामोरे जावं लागलं. जमावाने सुप्रियो यांच्या दिशेने दगडफेक केली. त्यात त्यांच्या गाडीच्या काचा फुटल्या. त्यामुळे पोलिसांनी जमावावर जोरदार लाठीमार केला.

पोलिसांनी लाठीमार सुरू केल्याने मतदारांनीही काठ्या घेऊन पोलिसांच्या दिशेने चाल केली. त्यामुळे या परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या घाबरल्या आहेत. त्यामुळेच मतदारांना प्रभावित करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप सुप्रियो यांनी केला. दरम्यान, शांतीपूर येथे एका मतदाराच्या घराजवळून देशी बॉम्ब हस्तगत करण्यात आला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!