Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : जादू टोणाकरून मिळवलेली खुर्ची जास्त काळ टिकणार नाही, विद्या चव्हाण यांचे टीकास्त्र

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई  : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारताण केलेल्या सत्यनारायणाच्या पूजेवरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. यावरून संभाजी ब्रिगेड , राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांच्या टीकेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. जादू टोना करून मिळवलेली मुख्यमंत्र्यांनी खुर्ची जास्त काळ टिकणार नाही, असा खोचक टोला त्यांनी शिंदे यांना लगावला आहे.

Advertisements

विद्या चव्हाण यांनी पुढे म्हटले आहे कि , दि. २१ ते २७ जूनच्या अमावस्येपर्यंत कामाख्या देवीच्या मंदिरात हवन करून, तिथले अघोरी पुजेचे धागेदोरे आणून मंत्रालयात बसवून मुख्यमंत्री आज पदभार स्वीकारला आहे. मुख्यमंत्री पदाची खुर्ची जाऊ नये म्हणून ही पुजा करण्यात आली आहे.

Advertisements
Advertisements

त्या पुढे म्हणाल्या, ”हा महाराष्ट्र आई तुळजा भवानीचा आहे. साडेतीन शक्तीपिठांचे आशीर्वाद या महाराष्ट्राला लाभले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्राची केलेली प्रतारणा राज्यातील पुरोगामी जनता कधीही सहन करणार नाही. त्यामुळे शिवबांच्या महाराष्ट्रात चातुर्याने किंवा जादूटोणा करून मुख्यमंत्रीपद मिळवलं असलं तरी, ते जास्त काळ टिकणार नाही.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!