Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumbaiNewsUpdate : मुख्यमंत्र्यांचा उल्लेख “रिक्षावाला” तर माजी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख “माफिया ” केल्याने सोमय्यांच्या ट्विटवरून वाद

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : भाजपनेते किरीट सोमय्या यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंत्रालयात जाऊन भेट घेतली आणि या भेटीनंतर त्यांनी केलेल्या एक ट्विट मुले शिंदे गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. तर सोमय्या यांनी आपण आपल्या ट्विटवर ठाम असल्याचे म्हटले आहे त्यामुळे नव्या वडाळा तोंड फुटले आहे. आपल्या ट्विटमध्ये भाजप नेते सोमय्या यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माफिया तर एकनाथ शिंदे यांना रिक्षावाला असे म्हटले आहे.

Advertisements

मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर सोमय्यांनी केलेल्या वादग्रस्त ट्विटमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, ‘आज ‘रिक्षावाला’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, शुभेच्छा दिल्या. माफिया मुख्यमंत्र्यांना हटविल्याबद्दल अभिनंदन केले.’

Advertisements
Advertisements

सोमय्या यांचे ते ट्विट चुकीचे  – केसरकर

दरम्यान, या सर्व पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे प्रवक्त आमदार दीपक केसरकर यांनी साम टीव्हीशी बोलताना आमच्या नेत्यांवर केलेले आरोप सहन करणार नसल्याचे  म्हटलं आहे. केसरकर म्हणाले, ‘ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना माफिया म्हणणं चुकीचं आहे, असे आरोप आम्ही सहन करणार नाही. तसंच हा प्रकार अतिशय चुकीचा आहे.

आमची आणि भाजपच्या सर्व आमदारांची एकत्रीत भेट झाली त्यावेळी भाजप-शिवसेनेच्या नेत्यांसमोर देवेंद्र फडणवीसांनी आपल्या भाषणामध्ये आपल्या पक्षातील माननीय व्यक्तींबद्दल कोणीही कॉमेंट करु नये, असं सांगितलं होतं. शिवाय आता आपण बाहेर असून मागे आल्यानंतर फडणवीस यांना असे आरोप करणं चुकीचं असून अशी वक्तव्य केली जाऊ नयेत याबाबत आपण फडणवीसांना जाब विचारणार असल्याचेही  ते म्हणाले.

होय ती माफियागिरीच – सोमय्या

तर दुसरीकडे भाजपनेते किरीट सोमय्या हे मात्र आपल्या भूमीकेवर ठाम आहेत. साम टिव्हीशी बोलताना सोमय्या यांना आपली या ट्विट करण्यामागे काय नेमकी भावना काय आहे. असं विचारलं असता ते म्हणाले, ‘भावना अगदी स्पष्ट आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी आमच्याशी माफियागिरी केली होती. ठाकरे सरकारमध्ये राऊत, पांडे यांना कायद्याचा दुरुपयोग केला. मनसुख हिरेन यांची हत्या केली अशी अनेक कामे सुपारी देऊन केली आहेत त्यामुळे ती माफियागिरीचं होती. यावर सोमय्या यांनी आपण ठाम असल्याचे सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!