Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraEducationUpdate : आजपासून सुरु झाला शाळकरी विद्यार्थ्यांचा चिवचिवाट …

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई  : कोरोनाच्या दोन ते अडीच वर्षाच्या सावटानंतर पहिल्यांदाच विनमस्क शाळा सुरु झाल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये वाढत्या महागाईच्या काळातही आनंद आहे . कारण शिक्षणाचा आनंदच वेगळा आहे . राज्यातील शाळा अधिकृतरित्या १३ जून रोजी सुरु झाल्या असल्या स्त्री शिक्षण विभागाने प्रत्यक्षात आज १५ जूनपासून पहिली ते दहावीपर्यंतच्या शाळा सुरु करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार आज राज्यातील शाळा सुरु होत आहेत.


दरम्यानच्या काळात देशात कोरोनाच्या संसर्गामुळे आधी शाळा बेमुदत बंद होत्या तर नंतर ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरु करण्यात आल्या होत्या यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे आणि गरीब विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले. मात्र आता कोणत्याही निर्बंधांविना शाळा सुरु झाल्या आहेत. दरम्यान  विदर्भातील तापमानाचा आढावा घेऊन विदर्भातील शाळा २७ जूनपासून सुरू होणार असल्याचेही  या निर्देशात म्हटले आहे.

Advertisements

कोरोनाबाबत योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना

राज्य सरकारच्या वतीने शालेय विभागाने अधिकृतरित्या शाळा जरी १३ जून रोजी झाल्या असल्या तरी विद्यार्थ्यांना १५ जून रोजी प्रत्यक्ष शाळेत बोलावण्यात यावे असे आदेशात म्हटले  होते. १३ आणि १४ जून रोजी शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहात शाळेची स्वच्छता, सौंदर्यीकरण तसेच कोरोना संदर्भात उद्बोधन करावे असे या आदेशात म्हटले होते. दरम्यान शाळेत येणारे विद्यार्थी तसेच पालकांचे कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने प्रबोधन करण्यात यावे असेही या आदेशात म्हटले होते. राज्यातील शाळा सुरु करण्यासाठी एकवाक्यता आणि सुसंगती येण्यासाठी शिक्षण आयुक्तांकडून निर्देश जारी करण्यात आले. या आदेशात शैक्षणिक सत्र २०२२ – २३ सुरू करण्यासाठी योग्य ते  निर्देश देण्यात आले आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!