Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : मोदी है तो मुमकिन है …म्हणत राज्यपालांकडून औरंगाबादचा पाणी प्रश्न थेट पंतप्रधानांनासमोर ….

Spread the love

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राज्यपालांच्या नूतनीकरण करण्यात आलेल्या जलभूषण इमारतीचे उदघाटन आणि द्वारपूजन करण्यासाठी आले तेंव्हा त्यांच्यासमोर आणि मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी औरंगाबादमधील पाणी समस्येचाही उल्लेख केला.


भगतसिंग आपल्या भाषणात म्हणाले कि, गेल्या ४० वर्षांपासून महाराष्ट्रात सूचनांचे काम सुरू आहे. पैसे खर्च केला जात आहे पण, त्याचा काहीच उपयोग होत नाही.औरंगाबाद शहरात पाण्याची तीव्र टंचाई आहे. लोकांना ७ दिवसाला ५ दिवसाला पाणी मिळत आहे . त्यामुळे अरुण जेटली म्हणायचे मोदी है तो मुमकीन आहे. मी आता आठ वर्षांनंतर म्हणतो मोदी है तो मुमकीन आहे, पंतप्रधान मोदी यांनी या योजना पूर्ण कराव्यात.

यावेळी ‘ जलभूषण ‘इमारतीचे उद्घाटन, द्वारपूजन पार पडल्यानंतर राजभवन येथील ब्रिटिशकालीन बंकरमध्ये “क्रांती गाथा” या भूमिगत दालनाचे उद्घाटनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी बोलत असताना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारच्या समस्या पंतप्रधांनांसमोर तीव्रतेने मांडल्या.

मोदी आपल्या भाषणात काय म्हणाले ?

यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि , “एका अतिशय चांगल्या कार्यक्रमासाठी आपण एकत्र आलो आहोत. स्वातंत्र्य समरातील वीरांना ही वास्तू समर्पित करताना मला अतिशय आनंद होत आहे. महाराष्ट्राचे राजभवन गेल्या काही दशकांमध्ये अनेक लोकतांत्रिक घटनांचे साक्षीदार आहेत. मी याआधीही राजभवनात आलो आहे. राजभवानाच्या इतिहासाला आधुनिकतेचे स्वरुप दिले आहे. यामध्ये महाराष्ट्राच्या अनुरुप शौर्य, आस्था, आध्यात्म आणि स्वातंत्र्य चळवळीच्या भूमिकेचेही दर्शन होते. इथून महात्मा गांधी यांनी भारत छोडो आंदोलन सुरु केलेली जागा लांब नाही. या भवनाने स्वातंत्र्याच्या वेळी तिरंग्याला अभिनाने फडकताना पाहिले आहे. देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. देशाच्या स्वातंत्र्यात योगदान देणाऱ्या प्रत्येक सेनानी आणि महान व्यक्तीमत्वाच्या व्यक्तीला आठवण्याची ही वेळ आहे,” असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकरांच्या वीरतेचे स्मरण…

“महाराष्ट्राच्या अनेक क्षेत्रांनी देशाला प्रेरित केले आहे. महाराष्ट्रात संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, समर्थ रामदास, संत चोखामेळा आदी संतांनी देशाला ऊर्जा दिली आहे. स्वराज्याबद्दल बोलायचे झाले तर छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे जीवन आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात देशभक्तीची भावना दृढ करते. आज दरबार हॉलमधून समुद्राचा विस्तार दिसतो तेव्हा मला स्वातंत्र्यवीर दामोदर सावरकरांच्या वीरतेचे स्मरण होते,” असे पंतप्रधान म्हणाले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले कि, आपल्या देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद दरबार हॉलचं लोकार्पण करण्यासाठी इथे आले होते तर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी इथे आले आहेत. आपल्या देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सतव साजरा करत असताना क्रांतीगाथा दालनाचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले हा चांगला मुहूर्त आहे. महाराष्ट्र सरकारनं १ मे रोजी प्राथमिक स्वरुपात एक पुस्तक तयार केलं आहे. ज्ञात आणि अज्ञात क्रांतिकारकांच्या इतिहासांचं स्मरण होण गरजेचं आहे.क्रांतीकारकांनी आपल्या देशासाठी ज्या गोष्टी केल्या आहेत. त्याच्या एक कण जरी आपण काम केलं तर ते कृतार्थ होतील, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान राज्यपालांच्या निवासस्थानाबद्दल बोलताना मुख्यमंत्री म्हणाले ‘जसं हे क्रांती भवन उभारलं आहे, तसंच राज्यपालांनी जलभूषण तयार केलं आहे. बहुत बडा अच्छा मकान बनाया है आपने, एक्सेंज करायचं का? मी ते बघतील, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना ऑफरच देऊन टाकली. यावेळी सभागृहात एकच हश्शा पिकला. ‘काळ बदला असला तरी या परिसरातील वास्तू या इतिहासाच्या पाऊल खुना आणि वारसा जपणाऱ्या आहे. त्याला कुठलाही धक्का न देता उभारले आहे, असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!