Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : राज्यात नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढू लागली, मृत्यूची संख्या मात्र चिंताजनकच

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात आज दिवसभरात ९ हजार ३५० नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. याबरोबरच आज बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या निदान झालेल्या रुग्ण संख्येहून अधिकच आहे. आज एकूण १५ हजार १७६ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर आज दिवसभरात ३८८ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.


आजच्या ३८८ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूबरोबरच राज्यातील मृत्यूदर १.९३ टक्के इतका आहे. याबरोबर राज्यात आतापर्यंत एकूण ५६ लाख ६९ हजार १७९ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.६९ टक्क्यांवर पोहोचले आहे.

Advertisements

राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या

राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या १ लाख ३८ हजार ३६१ इतकी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुण्यात एकूण १७ हजार ६२३ इतके रुग्ण आहेत. मुंबई पालिका हद्दीत हा आकडा १७ हजार ५१९ इतका आहे. ठाणे जिल्ह्यात सध्या १४ हजार ०३२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर कोल्हापुरात सक्रिय रुग्णांची संख्या १२ हजार ९४९ इतकी आहे. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ४ हजार ७३५ इतकी झाली आहे. नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ४ हजार ६४० इतकी आहे.या बरोबरच अहमदनगरमध्ये ४ हजार ७०५ इतकी आहे.

Advertisements
Advertisements

औरंगाबादमध्ये १ हजार ६३७, नांदेडमध्ये ही संख्या १ हजार १८१ इतकी आहे. जळगावमध्ये २ हजार ८०६, तसेच तर रायगडमध्ये एकूण ४ हजार ०२३ इतके सक्रिय रुग्ण आहेत. अमरावतीत ही संख्या १ हजार २४५ इतकी आहे, राज्यात सर्वात जास्त सक्रिय रुग्णांची संख्या पुण्यात आहे. तर, सर्वात कमी सक्रिय रुग्णांची संख्या गडचिरोली जिल्ह्यात आहे. येथे सक्रिय रुग्णांची संख्या ३२७ इतकी आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!