Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

InformationUpdate : आता फक्त “हेल्मेट” नव्हे , तुमच्या डोक्यावर हवे “आयएसआय हेल्मेट ” !!

Spread the love

नवी दिल्ली : वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या आदेशानुसार आता आयएसआय मार्क नसलेल्या हेल्मेटच्या उत्पादन, आयात, विक्री आणि साठवणुकीला बंदी घातली आहे. या नियमांतर्गत दुचाकी चालवताना आयएसआय मार्क असणारे हेल्मेट न वापरणाऱ्या चालकाविरोधात गुन्हा दाखल केला जाऊ शकतो तसेच दंडही ठोठावला जाऊ शकतो. यामुळे तुम्ही हेल्मेट घातलेले असले तरीही तुम्हाला शिक्षा आणि दंड अशा कारवाईला सामोरे जावे लागू शकते. मंत्रालयाने १ जूनपासून हा नियम लागू केला आहे.

काय आहे नियम ?

केंद्र सरकारच्या नव्या नियमानुसार, जर कोणी आयएसआय मार्क नसलेले हेल्मेट विकत असेल किंवा खरेदी करत असेल तर दोघांवरही कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. यामुळे आता दुचाकी चालकांना आयएसआय मार्क असणारं हेल्मेट घालणं अनिवार्य आहे. हे हेल्मेट BIS (ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड) गुणवत्ता मार्गदर्शकानुसार असणं गरजेचं आहे.

गेल्या १ नोव्हेंबर २०१८ मध्येही असाच निर्णय जारी केला होता. दरम्यान रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून २६ नोव्हेंबर २०२० रोजी यासंबंधी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये स्पष्टपणे सर्व दुचाकींसाठी वापरण्यात येणारे हेम्लेट बीआयएस गुणवत्ता मार्गदर्शकांनुसार असले पाहिजेत तसंच १ जूनपासून त्यांच्यावर आयएसआय मार्क असला पाहिजे असे सांगण्यात आले आहे.

हेल्मेट विक्रेते येणार अडचणीत

या नव्या नियमांच्या सहाय्याने दुचाकीस्वारांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा तसेच ती अजून चांगली करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. दरम्यान कायद्याचे आणि नियमांचे पालन न करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई केली जाणार आहे. जर एखादी व्यक्ती आयएसआय मार्क नसणाऱ्या हेल्मेटचे उत्पादन, विक्री, साठवणूक किंवा आयात करत असेल तर त्याला एक वर्षांपर्यंतची जेल किंवा एक ते पाच लाखांपर्यंतचा दंड भरावा लागू शकतो.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!