Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaMaharashtraUpdate : ६७ हजार १३ नवे कोरोनाबाधित , ५६८ रूग्णांचा मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : गेल्या २४ तासात राज्यात ६७ हजार १३ कोरोनाबाधित वाढले असून, ५६८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातील मृत्यू दर १.५३ टक्के एवढा आहे. याशिवाय आज ६२ हजार २९८ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३३,३०,७४७ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण  ८१.३४ टक्के एवढे झाले आहे.

Advertisements

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,४८,९५,९८६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४०,९४,८४० (१६.४५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९,७१,९१७ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २९,०१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,९९,८५८ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. कोरोना रुग्णांची देशात सर्वाधिक संख्या महाराष्ट्रात असताना केंद्राकडून महाराष्ट्राला दिल्या जाणाऱ्या प्रत्येक मदतीत दुजाभाव दाखवला जात असल्याचे राज्यातील नेत्यांचे म्हणणे आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!