Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : २८ लाखांचा गुटखा जप्त खाजगी, दोघांना अटक

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – गुन्हेशाखेने व अन्न व औषध प्रशासनाने आज दुपारी जुना मोंढा परिसरात २७ लाख ४८ हजार ५४०रुपयांचा गुटख् जप्त केला. या प्रकरणी बॅटको ट्रान्सपोर्टचा व्यवस्थापक आणि गुटखा व सुगंधी तंबाखू मागवणार्‍या दोघांना अटक करण्यात आली असून जिन्सी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Advertisements

बॅटको ट्रान्सपोर्ट चा व्यवस्थापक हनीफ अब्दुल पटणी(४३) आणि गुटखा मागवणारा नदीम शेख अशी अटक आरोपींची नावे आहेत. गुन्हे शाखेचे एपीआय अजबसिंग जारवाल यांना खबर्‍याने टीप दिल्यानंतर वरील कारवाई पार पडली.मध्यप्रदेशातील इंदोर येथून हा गुटखा मागवण्यात आल्याचे पोलिस तपासात उघंड झाले आहे. पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय अजबसिंग जारवाल,अन्न व औषध प्रशासनाचे एम.एम. फाळके,टापरे, पोलिस कर्मचारी शिवाजी झिने, प्रकाश चव्हाण, राजेंद्र सोळुंके , वाठ्ठल सुरे यांनी पार पाडली, पुढील तपास पोलिस निरीक्षक व्यंकट केंद्रे करंत आहेत

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!