Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

VidarbhaNewsUpdate : हृदयद्रावक : कुलरच्या धक्क्याने तीन चिमुकल्या बहिणींचा मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

यवतमाळ जिल्ह्यातील  राळेगाव तालुक्यातील श्रीरामपूर (कोदुरली) येथे गुरुवारी सकाळी आठ वाजता घडलेल्या हृदयद्रावक घटनेत कुलरचा शॉक लागून तीन लहान बहिणींचा जागेवरच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. रिया गजानन भुसेवार (वय-6), मोनिका गजानन भुसेवार (वय-4) आणि मोंटी गजानन भुसेवार (वय-2) अशी मृत मुलींची नावं आहेत. पोलीस घटनास्थळी पोहचले असून तपास सुरू आहे.

Advertisements

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तिन्ही बहिणी गुरुवारी सकाळी घरात जेवण करीत होत्या. त्या दरम्यान तीन मुलींपैकी एक जण कुलर सुरू करण्यास गेली तर तिथेच ती शॉक लागून अडकली. तिला काढण्यासाठी दुसरी मुलगी गेली तर तिला सुद्धा शॉक लागला. नंतर तिसरी मुलगी आपल्या बहिणीला काढायला गेली तर तिलाही शॉक बसला. तिन्ही बहिणींचा जागीच मृत्यू झाला. घटना घडली तेव्हा तिन्ही बहिणी घरात एकट्याच होत्या. मुलींचे आई-वडील शेतात गेले होते. घरात कोणीही नसल्यामुळे तिन्ही बहिणींचे मृतदेह घरातच पडून होते. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

Advertisements
Advertisements

सदर घटनेची माहिती मिळताच तहलीलदार डॉ. रवींद्र कानडजे, गटविकास अधिकारी रविकांत पवार, पोलिस उपनिरीक्षक दिलीप पोटभरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, सध्या पावसाळा सुरू आहे. मात्र, अजून काही भागात समाधानकारक पाऊल झाला नाही. त्यामुळे अजूनही उन्हाळ्यासारखा उकाडा जाणवत आहे. त्यामुळे कुलरचा वापर सुरूच आहे. यातच ही दुर्दैवी घटना घडली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!