Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaPuneUpdate : पिंपरी-चिंचवडचे राष्ट्रवादीच्या आणखी एका ज्येष्ठ नगरसेवकाचे निधन

Spread the love

पिंपरी-चिंचवडमध्ये नुकतंच राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक दत्ता साने यांचे करोनामुळे निधन झाले होते. त्याला महिना उलटत नाही की, राष्ट्रवादी च्या आणखी एका विद्यमान नगरसेवकाचे निधन  झाले आहे. जावेद शेख (वय-५०) असे निधन झालेल्या नगर सेवकाचे नाव आहे. हे दोन सच्चे कार्यकर्ते कायमचे निघून गेल्याने राष्ट्रवादीत मोठी पोकळी निर्माण झाल्याचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी दुःखद प्रतिक्रिया दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा चे मोठे नुकसान झाले असून एकाच महिन्यात दोन विद्यमान नगरसेवकांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे. ४ जुलै ला दत्ता साने यांचे निधन झाले. करोना बाधित जावेद शेख यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात १५ दिवसांपासून उपचार सुरू होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते असे निकटवर्तीयांनी सांगितले आहे. काल त्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. मात्र ती निगेटिव्ह आली होती. ते आकुर्डी परिसरातील विद्यमान नगरसेवक होते. त्यांनी तीन वेळेस नगरसेवक पद भूषविले आहे. जावेद शेख हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून २००७ बिनविरोध, २०१२ आणि २०१७ च्या निवडणुकीत ते नगरसेवक पदावर निवडून आले होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रध्दांजली

पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांच्या निधनाने सामान्यांच्या प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा धडाडीचा कार्यकर्ता, सच्चा सहकारी गमावल्याची भावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांनी सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी कायमच तळमळीने काम केले. त्यांच्या निधनाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा धडाडीचा कार्यकर्ता, सच्चा सहकारी गमावला आहे. संघटनेसाठी धडाडीने काम करणाऱ्या या झुंजार सहकाऱ्याची उणीव कायमच जाणवेल. आकुर्डी गावठाण भागातून त्यांनी महानगरपालिकेचे तीनवेळा प्रतिनिधीत्व केले. सामान्य जनतेच्या प्रश्नांसाठी सभागृहात कायम आवाज उठविला. सामाजिक क्षेत्रातील तसेच महानगरपालिकेच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य कायम स्मरणात राहील, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!