Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Crime News Update : ७३ वर्षीय वृध्दाकडून शिक्षीकेचे लैंगिक शोषण

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – ७३वर्षीय वृध्दाने शिक्षीकेचे शहरात लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा वेदांतनगर पोलिस ठाण्यात दाखल होऊन नांदेडच्या इतवारा पोलिस ठाण्यात शनिवारी वर्ग केला.
इनामदार पाशा(७३) रा. रहेमतनगर नांदेड असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.रेल्वेस्टेशन परिसरातील एका लाॅजवर आरोपीने बलात्कार केल्याची तक्रार पिडीत शिक्षीकेने दिली आहे. शुक्रवारी सकाळी ९च्या सुमारास पिडीता तिच्या आई आणि भावासहित नांदेडहून औरंगाबादेत येण्यास निघाले होते.त्यावेळेस आरोपीही होता. शहरात रेल्वेस्टेशनला उतरल्यानंतर पिडीतेच्या आई आणि भावाला जेवणासाठी हाॅटेलमधे पाठवले.व आरोपी पिडीतेला घेऊन मौलाना आझाद महाविद्यालयात पिडीतेचे अॅडमिशन करुन देण्यासाठी पिडीतेसोबंत आला होता. पण आझाद महाविद्यालयातून निघाल्यानंतर आरोपीने पिडीतेला एका लाॅजवर नेले व बलात्कार केला असा आरोप पिडीतेने केला आहे.
.पिडीता आणि आरोपी हे गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखतात.त्या ओळखीचा गैरफायदा घेत आरोपीने तीन /चार वेळेस नांदेडलाही लैंगिक शोषण केल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर वर्ग करण्याची प्रक्रिया पोलिस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!