Bihar : किरकोळ कारणावरून त्याने भाजी विक्रेत्याचा केला गोळ्या घालून खून , हल्लेखोर पसार

A controversial program which can turn your iphone into a fake gun ....
भाजीवाल्याने काकडी मोफत दिली नाही म्हणून त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बिहारमधील बेगुसराय येथे शनिवारी रात्री हा धक्कादायक प्रकार घडला. येथील कोर्मापूर रोडवरील भाजीविक्रेत्याने ग्राहकाला मोफत काकडी देण्यास नकार दिला. त्यानंतर संतापलेल्या या ग्राहकाने भाजीवाल्यावर गोळीबार केला. यामध्ये भाजीवाल्याचा दुर्देवी अंत झाला.
‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’ने दिलेल्या वृत्तानुसार गोळीचा आवाज आल्यानंतर परिसरातील सर्व स्थानिक आणि भाजीविक्रेत्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र गर्दी आणि गोंधळाचा फायदा घेऊन गोळीबार करणाऱ्या आरोपीने तेथून पळ काढला. या भाजीवाल्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र अती रक्तस्त्राव झाल्याने या भाजीवाल्याचा वाटेतच मृत्यू झाला. रुग्णालयात दाखल केले तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणात पोलिसांनी चौकशी सुरु केली असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. गोळीबार ज्या बंदुकीमधून करण्यात आली ती बेकायदेशीर होती अशी माहिती समोर आली आहे. अशाप्रकारे विनापरवाना शस्त्रांनी एखाद्यावर हल्ला करण्याचे प्रकार याआधीही बिहारमध्ये घडले आहेत.
बिहारमध्ये विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्यांची संख्या खूप असल्याचे बोलले जाते. मात्र अशाप्रकारे शस्त्रे बाळगणाऱ्यांवर गुन्हा घडेपर्यंत कोणतीही कारवाई केली जात नाही अशी टिकाही केली होते. मात्र दिवसोंदिवस अशाप्रकारच्या हल्ल्यांमध्ये वाढ होत असल्याने सरकारने विनापरवाना शस्त्रांसंदर्भात कठोर पावले उचलावी अशी अपेक्षा सामान्य नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.