Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

PuneAccidentUpdate : पोर्शे अपघात प्रकरणात आरोप पत्रात आणखी एक धक्कादायक माहिती झाली उघड !!

Spread the love

पुणे : कल्याणी नगरमधील पोर्शे अपघात प्रकरणात  पोलिसांनी  ९०० पानांचे आरोपपत्र शिवाजीनगर न्यायालयात नुकतेच दाखल करण्यात आले. यामध्ये आणखी एक धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. ती म्हणजे बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या मुलासह त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांचेही रक्ताचे नमुने बदलण्यात आले. ससून रुग्णालयातील मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षात डॉ. अजय तावरे याच्या आदेशानुसार डॉ. श्रीहरी हाळनोर याने एका कनिष्ठ महिला डॉक्टरच्या मदतीने रक्ताचे नमुने बदलण्यात आले. त्यावेळी तेथे काही पोलिसही उपस्थित होते, असे आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात आरोपींची संख्या, त्यांचा सहभाग, त्याबाबत साक्षीदारांचे जबाब, परिस्थितीजन्य आणि वैद्यकीय पुरावे याबाबतची माहिती देण्यात आली आहे. कल्याणीनगर भागात १९ मे रोजी मध्यरात्री हा अपघात झाला होता. अपघातात दुचाकीस्वार संगणक अभियंता अनिश अवधिया आणि त्याची मैत्रीण अश्विनी कोस्टा यांचा मृत्यू झाला.

सामान्यांनी व्यक्त केला होता संताप…

या अपघात प्रकरणात बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवालच्या मुलाला ताब्यात घेण्यात आले. मुलगा अल्पवयीन असल्याने येरवडा पोलिसांनी त्याला बाल न्याय मंडळात हजर केले. बाल न्याय मंडळाने त्याला वाहतूक समस्येवर ३०० शब्दांचा निबंध, वाहतूक पोलिसांबरोबर चौकात थांबून वाहतूक नियोजन करावे अशा अटी, शर्तींवर त्याला जामीन मंजूर  करून अपघातानंतर अवघ्या पंधरा तासात मुलाची मुक्तता करण्यात आल्याने सामान्यांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी बाल न्याय मंडळाच्या निर्णयाला आव्हान दिले. त्यानंतर बाल न्याय मंडळाने मुलाची बालसुधारगृहात रवानगी केली.

मुलाला वाचविण्यासाठी….

दरम्यान या अपघातानंतर मुलाला वाचविण्यासाठी वडील विशाल अगरवाल, आई शिवानी, आजोबा सुरेंद्र यांनी प्रयत्न केले. मोटारचालक गंगाधर हेरीक्रुब यांना अल्पवयीन मुलाने केलेला गु्न्हा अंगावर घेण्यासाठी धमकावले. ससून रुग्णालयात मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यात आले. मुलाला वाचविण्यासाठी आई शिवानीने स्वत:च्या रक्ताचे नमुने दिले. रक्ताचे नमुने बदलण्यासाठी ससूनमधील डाॅ. अजय तावरे, डाॅ. श्रीहरी हाळनोर यांना ससूनमधील शिपाई अतुल घटकांबळे यांच्यामार्फत तीन लाख रुपये पैसे देेण्यात आले. अगरवाल यांचा परिचित अश्फाक इनामदार, अमर गायकवाड यांच्यामार्फत बाल न्याय मंडळाच्या आवारात घटकांबळेला पैसे देण्यात आले होते.

डॉक्टरच्या जबाबातून माहिती उघड झाली ….

अपघात झाला त्यावेळी अल्पवयीन मुलासोबत मोटारीत त्याचे दोन मित्र होते. मित्र अल्पवयीन आहेत. ससून रुग्णालयात त्यांच्याही रक्ताचे नमुने घेण्यात आले. डाॅ. तावरे याच्या सांगण्यानुसार, डॉ. हाळनोर याने एका कनिष्ठ महिला डॉक्टरला वैद्यकीय कक्षात बोलावून घेतले. तेथे अल्पवयीन मुलाऐवजी अन्य दोन मुलांचे रक्ताचे नमुने घेतले, अशी माहिती तपासात मिळाली होती. याप्रकरणी संबंधित महिला डॉक्टरचा तपशीलवार जबाब पोलिसांनी नोंदवला आहे. डॉ. हाळनोर याने अल्कोहोलमध्ये भिजवलेला कापूस न वापरता कोरड्या कापसाने रक्ताचे नमुने घेण्याची सूचना केली होती, असे या डॉक्टरने जबाबात नमूद केले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!