Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BJPNewsUpdate : उद्धव ठाकरे हे हताश निराश, त्यांच्या डोक्यावरचा ताबा सुटलाय…देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार !!

Spread the love

पुणे : उद्धव ठाकरे हे हताश निराश झाले असून त्यांच्या डोक्यावरचा ताबा सुटलाय त्याला अपान काय उत्तर देणार ? त्यांनी यातून आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे दाखवून दिले असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.  ते नागपुरात बोलत होते. देशाचे गृहमंत्री अमित शाह अहमदशाह अब्दालीचे राजकीय वंशज आहेत, अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पुण्यातील मेळाव्यातून अमित शाहांवर केली आहे. उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर देवेंद्र फडणवीसांनी हे प्रत्युत्तर दिले आहे. 

माध्यमांशी  बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्या डोक्यावरचा ताबा सुटलाय. ते सध्या अत्यंत फ्रस्ट्रेशनमध्ये आहे. त्या फ्रस्ट्रेशनमध्ये ते ज्या प्रकारचे शब्द वापरत आहे, त्यावर आपण काय उत्तर देणार आहोत. एखादी व्यक्ती फ्रस्ट्रेशनमध्ये डोकं बिघडल्यासारखे बोलत असते, त्यावेळी त्याला उत्तर द्यायचे नसते. पण हे भाषण करून त्यांनी आपण औरंगजेब फॅन क्लबचेच आहोत हे त्यांनी दाखवून दिलं .

जे काही समोर येत आहे त्याची योग्य चौकशी करू

सचिन वाझेंनी माझी नार्को टेस्ट करा असे म्हटले आहे याविषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी पण माध्यमातून बघितले आहे.. मला पत्र पाठवले तुमच्या माध्यमातूनच पहिले. अजून मी काही पाहिले नाही. कारण मी दोन दिवस नागपुरात आहे. असे काही आले असेल तर मी ते पाहून त्याच्यावर प्रतिक्रिया देईल. जे काही समोर येत आहे त्याची योग्य चौकशी करू.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे?

पुण्यात झालेल्या मेळाव्यात आज उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि अमित शाहांवर जोरदार हल्लाबोल केला. अमित शाह हे अहमदशाह अब्दालीचे वंशज आहेत अशी घणाघाती टीका त्यांनी केली. तर भाजपचा राज्यात सत्ता जिहाद सुरू आहे असं ते म्हणाले. उद्धव ठाकरे म्हणाले, आजपासून मी अमित शाहला अहमदशहा अब्दाली म्हणणार आहे. तो मला नकली संतान म्हणतो, औरंगजेब फॅन क्लब म्हणतो तर मी देखील त्याला अहमदशहा अब्दाली म्हणणार. तो अहमदशहा अब्दालीच आहे. त्याला घाबरायचे कारण नाही. ज्या पद्धतीनं औरंगजेबाची इथे कबर बांधली तशी भाजपची राजकीय कबर बांधा…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!