Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Yashshree Shinde murder case : यशश्री शिंदे खून प्रकरणातील आरोपी दाऊद शेख पोलिसांच्या ताब्यात…

Spread the love

मुंबई : मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबईतील यशश्री शिंदे या २० वर्षीय तरुणीच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी दाऊद शेख याला अटक केली आहे. उरण पोलिसांनी दाऊद शेख याला कर्नाटकातील शाहपूर गुलबर्ग येथून अटक केली आहे. त्याला कर्नाटकातून महाराष्ट्रात आणले जात आहे.

गेल्या तीन दिवसांपासून नवी मुंबई पोलिसांकडून या हत्याकांड प्रकरणातील आरोपीचा शोध सुरू होता. मात्र तो पोलिसांना चकमा देत होता. अखेर त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. त्याला आता कर्नाटकमधून नवी मुंबईत आणले जात आहे. दाऊद शेखच्या चौकशीमधून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी 20 वर्षीय यशश्री शिंदे हिचा मृतदेह नवी मुंबईतील रेल्वे स्थानकाजवळील झुडपात आढळून आला होता. मुलीच्या वडिलांनी 2019 मध्ये आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केल्याचे समोर आले आहे. याचा बदला घेण्यासाठी आरोपीने मुलीची हत्या केली.

उरण रेल्वे स्थानकाजवळील झुडपातून मुलीचा मृतदेह सापडला होता. नवी मुंबईतील आपल्या कार्यालयातून अर्ध्या दिवसाच्या रजेवर गेल्यानंतर दुपारी 3.30 ते 4.30 च्या दरम्यान तिची हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. कुटुंबीयांनी सांगितले की, पीडितेच्या वडिलांनी 2019 मध्ये आपल्या मुलीचा छळ केल्याबद्दल त्या व्यक्तीविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली होती, ज्याचा बदला म्हणून त्याने आपल्या मुलीची हत्या केली.

नराधम दाऊद शेख हा मूळचा कर्नाटकचा रहिवासी असून उरण येथे ड्रायव्हरचे काम करत होता. त्याची इथेच मयत यशश्रीशी भेट झाली. पोलिसांच्या माहितीनुसार याच मुलीच्या संदर्भात त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता आणि त्यातच त्याला तुरुंगवासही झाला. काही महिन्यांपूर्वी तो बाहेर आला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा मुलीच्या संपर्कात येऊन परवाची ही घटना घडली आहे. पोलिसांनी यापूर्वीच आरोपीच्या जवळच्या सहकाऱ्यांना व परिवारातील लोकांना ताब्यात घेतले होते. आता आरोपीला देखील पकडण्यात आले आहे.

हत्या होण्यापूर्वीच व्हिडीओ मिळाला

दरम्यान या प्रकरणात आता मोठी अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे यशश्रीची हत्या होण्यापूर्वी कही वेळेआधीचा एक व्हिडीओ आता समोर आला आहे. सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला हा व्हिडीओ 25 जुलैरोजी दुपारी 2 वाजून 14 मिनिटं आणि 35 सेकंदाचा आहे. ज्यामध्ये यशश्री हातात काळी छत्री घेऊन जाताना दिसत आहे. तर दुसरा व्हिडीओ हा आरोपी दाऊद शेखचा आहे. हा व्हिडीओ दुपारी 2 वाजून 22 मिनिटांचा आहे. दहा मिनिटांनंतर त्याने यशश्रीचा पाठलाग सुरू केल्याचं सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे.

आणखी एका व्यक्तीला अटक

दरम्यान नवी मुंबई पोलिसांनी याप्रकरणी कर्नाटकातून मोहसिन नावाच्या आणखी एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.मोहसिन फोनवर सातत्यानं यशश्रीच्या संपर्कात असल्याचं समोर येत आहे. यासंदर्भात पोलिसांकडे पुरावे असल्याची माहिती मिळाली आहे. मोहसिनला पुढील चौकशीसाठी महाराष्ट्रात आणलं जाणार आहे. यशश्रीचे कॉल रेकॉर्ड्स तपासले असता एका नंबरवर तिचं सातत्याने बोलणे होत असल्याचे समोर आले होते . पोलिसांनी तपासाची दिशा त्यानुसार वळवली. यानंतर तो नंबर ज्याच्या नावावर होता, त्याचा शोध घेण्यास सुरुवात झाली. आता अखेर पोलिसांनी तो नंबर ज्या व्यक्तीचा होता, त्याला कर्नाटकातून ताब्यात घेतले आहे.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!