Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraPoliticalUpdate : अखेर महाविकास आघाडीचे जागा वाटप जाहीर, सांगली भिवंडी राखण्यात काँग्रेसला अपयश , पवार -ठाकरेंसमोर समोर नेते झाले हतबल …!!

Spread the love

मुंबई : अखेर महाविकास आघाडीने एकत्रित पत्रकार परिषद घेत आपले जागा वाटप जाहीर केले आहे. नरिमन पॉइंट येथील शिवालय इथं झालेल्या मविआच्या या पत्रकार परिषदेला उद्धव ठाकरे, शरद पवार, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, संजय राऊत आदी नेते उपस्थित होते. यावेळी राज्य पातळीवर आणि इंडिया आघाडीमध्ये राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, माकप, समाजवादी पक्ष, शेतकरी कामगार पक्ष हे समाविष्ट असल्याचे सांगण्यात आले.

या पत्रकार परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महाविकास आघाडीचा २१-१७-१० असा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती दिली. तसेच कोणता पक्ष कोणत्या मतदारसंघात निवडणूक लढवणार याबाबतची माहिती दिली.

महाविकास आघाडीचे जागावाटप

काँग्रेस : नंदुरबार, धुळे, नांदेड, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमुर, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई, मुंबई उत्तर पूर्व अशा एकूण १७ जागा

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष : बारामती, शिरूर, सातारा, माढा, अहमदनगर दक्षिण, रावेर, भिवंडी, बीड, वर्धा, दिंडोरी अशा एकूण १० जागा.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे : जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण, ठाणे, रायगड, मावळ, उस्मानाबाद (धाराशीव,) रत्नागिरी, बुलढाणा, हातकणंगले, औरंगाबाद (संभाजीनगर ) , शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ-वाशिम, मुंबई दक्षिण मध्य, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण, मुंबई ईशान्य अशा एकूण १० जागा.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!