Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraLoksabhaNewsUpdate : महाराष्ट्रात चौथी आघाडी मैदानात , ओबीसी बहुजन पार्टीकडून ९ उमेदवारांच्या नावांची घोषणा…

Spread the love

मुंबई : एप्रिलपासून सुरु होत असलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी महायुती, महाविकास आघाडी , वंचित बहुजन आघाडी सोबतच आता चौथी आघाडी म्हणून उदयास आलेल्या ओबीसी बहुजन पार्टीकडून ९ उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये, बारामती लोकसभा मतदारसंघाचेही नाव असून येथून महेश भागवत यांना पक्षाने उमेदवारी जाहीर केली आहे.

मराठवाड्यातून नांदेड लोकसभा मतदारसंघात ॲड. अविनाश भोशीकर यांना उमेदवारी देत आहोत, ७० टक्के इथे ओबीसी मतदान आहे. परभणीतून हरीभाऊ शेळके यांना उमेदवार देत आहोत, जे धनगर नेते आहेत, ते लोकसभा लढवणार आहेत, अशी माहितीही शेंडगे यांनी दिली. दरम्यान, सोमवारी आम्ही हातकणंगले संदर्भात उमेदवारीचा निर्णय जाहीर करु, असंही प्रकाश शेंडगे यांनी स्पष्ट केले. ओबीसी बहुजन पार्टीने जाहीर केलेल्या ९ उमेदवारांमध्ये हिंगोली – ॲड. रवी शिंदे , यवतमाळ- वाशिम – प्रशांत बोडखे, बारामती : महेश भागवत, बुलढाणा – धनगर समाजाचे नंदुभाऊ लवंगे, शिर्डी : मातंग समाजाचे नेते अशोक अल्लाड , हातकणंगले – मनिषा डांगे आणि प्रा. संतोष कोळेकर यांच्यापैकी एक.

दरम्यान आज ओबीसी बहुजन पार्टीचे नेते प्रकाश शेंडगे यांनी पक्षाच्यावतीने ९ उमेदवारांची घोषणा करण्याता आल्याची माहिती दिली. मात्र ओबीसी बहुजन पार्टीकडून कोल्हापूरात शाहू महाराजांना पाठिंबा जाहीर केला आहे. तर, अकोल्यातून वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबडेकरांना पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सांगलीतून प्रकाश शेंडगे मैदानात उतरल्यास त्यांना वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा असेल असे आंबेडकर यांनी आधीच घोषित केले आहे.

ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार जाहीर केल्यानंतर प्रकाश शेंडगे म्हणाले की, आज आमच्या सुकाणू समितीची बैठक झाली. आज बैठकीत आम्ही ९ उमेदवार फिक्स केले आहेत. प्रकाश आंबेडकरांसोबत चर्चा सुरु आहे. त्यात त्यांनी सांगलीतील जागेवर आम्हाला समर्थन केलेलं आहे. मी स्वत: जर निवडणूक लढवली तर प्रकाश आंबेडकर सांगलीतील जागेवर पाठिंबा देणार आहेत. प्रकाश आंबेडकर अकोल्यातून निवडणूक लढवत आहेत, तिथे आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. आम्ही कोल्हापूर आणि हातकणंगले संदर्भात भूमिका घेतली आहे. ज्यात कोल्हापूरच्या जागेवर शाहू महाराजांना आम्ही पाठिंबा देतोय.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!