Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Uddhav Thackeray NewsUpdate : अडीच -अडीच वर्षावर पुन्हा बोलले उद्धव ठाकरे आणि घेतली तुळजाभवानीची शपथ …..

Spread the love

उस्मानाबाद : गृहमंत्री अमित शाह यांनी मातोश्रीवर येऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्षे व भाजपाचा अडीच वर्षे होईल. अडीच वर्षांच्या काळात भाजपाला सांभाळून घ्या असे वचन  दिले होते. मात्र, मी ते वचन दिलेच नाही अशी बोंब ते मारत आहेत. पण आई तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगतो, अमित शाहांनी मला मातोश्रीवर येऊन अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद वाटून घेण्याचे वचन दिले होते असे पुन्हा एकदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जाहीर सभेत ठणकावून सांगितले.

उमरगा येथील जनसंवाद यात्रेत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बोलत होते. यावेळी शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, खासदार संजय राऊत, आमदार कैलास पाटील, नेत्या सुषमा अंधारे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष केशव उर्फ बाबा पाटील, महेश देशमुख, नाना भोसले, विजय वाघमारे, सुभाष राजोळे उपस्थित होते.

मात्र, भाजपाच्या गोमूत्रधारी हिंदुत्वासारखे नसल्याचे त्यांनी ठासून सांगितले. ही लढाई भावी पिढीसाठी असून उद्या आम्ही जिंकणारच असा विश्वास व्यक्त करीत ज्यांना भाजपमध्ये जायचे असेल त्यांनी आता जावे असा सल्लाही त्यांनी दिला. भाजपाने जरी आमदार खासदार विकत घेतले असले तरी पन्नास खोक्यांमध्ये संपूर्ण राज्यातील जनता तुम्हाला विकत घेता येणार नाही असा टोला लागावं ही जनता लाचार नसल्याचे सांगत आम्ही श्रीरामाचे भक्त आहोत असा इशाराही त्यांनी मोदी – शाह यांनी दिला.

ठाकरे म्हणाले, अट्टल व सच्चा शिवसैनिक काय असतो हे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर व आमदार कैलास पाटील हे मूर्तिमंत उदाहरण आहेत असे सांगत त्या दोघांचे जाहीर अभिनंदन केले. तसेच माजी खासदार रवींद्र गायकवाड, व आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यावर ही त्यांनी टीका केली. त्याबरोबरच काँग्रेस मधून भाजपामध्ये गेलेल्या बसवराज पाटील यांचाही शेलक्या शब्दांत समाचार घेतला. तसेच मी राज्यभर संवाद यात्रेच्या माध्यमातून फिरत आहे. या सभेमध्ये इतर सर्व धर्मियांसह मुस्लिम समाजही मोठ्या प्रमाणात आमच्याबरोबर येत असून आमचे हिंदुत्व हे सर्व समाजाला बरोबर घेऊन काम करणारे आहे.

होय मी आदित्यला मुख्यमंत्री करेन .. शहा-मोदींचं कर्तृत्व असे काय?

आमचे हिंदुत्व हे लोकांच्या घरातील चुल पेटवणारे आहे, मात्र भाजपच हिंदुत्व मात्र घरे पेटवणारे आहे. लोकशाहीचा मुडदा पाडण्याचं काम भाजप करत आहे. सर्व जातीतील धर्मातील लोकांनी एकत्र येऊन, पूर्ण एकजूटीने भाजपच्या हुकूशाहीला हद्दपार केले पाहिजे, असे आवाहन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. “देशाचे गृहमंत्री अमित शाह सतत घराणेशाहीवर बोलत असतात. माझे आजोबा प्रबोधनकार आणि वडिल हिंदुहृदयसम्राट या देशात लोकांच्या हितासाठी त्यांची घराणेशाही होती. शहा-मोदींचं कर्तृत्व असे काय? अशा शब्दात टीका ठाकरेंनी केली. होय मला तुमची जनतेची साथ असेल तर आदित्यला मुख्यमंत्री करेन, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!