Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

२९ वर्षीय महिला अभियंत्याचा बेडरूममध्ये रहस्यमय परिस्थितीत आढळला मृतदेह

Spread the love

बिहार: राज्याच्या जलसंपदा विभागात सहाय्यक अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या २९ वर्षीय महिला अभियंत्याचा मृतदेह तिच्या बेडरूममध्ये पडलेला आढळून आला. बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यात तिच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये एकटीच राहणारी एक महिला अभियंता “गूढ परिस्थितीत” मृत सापडली आहे.

तिचा खून कोणी केला, याचा तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी रविवारी सांगितले की, महिमा कुमारी (29) असे मृत महिला अभियंत्याचे नाव आहे, ती लखीसराय जिल्ह्यातील माननपूर बाजार येथील रहिवासी आहे.

पोलिसांनी सांगितले की, जलसंपदा विभागाच्या यांत्रिकी विभागाच्या सहाय्यक अभियंता महिमा कुमारी यांचा मृतदेह शनिवारी सायंकाळी सदर पोलीस स्टेशन हद्दीतील अतर्दह मोहल्ला येथे भाड्याच्या घरात आढळून आला.

तिच्या मानेजवळ चेहऱ्यावर जखमेच्या खुणा

खोलीच्या फरशीवर मृतदेह पडलेला होता. तीचा बराच वेळापूर्वी मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. महिमा ही मूळची लखीसराय येथील रहिवासी असून ती अविवाहित होती. 2020 पासून येथे काम करणारी महिमा ही भाड्याच्या घरात राहत होती.

तिच्या मानेजवळ चेहऱ्यावर जखमेच्या खुणा होत्या. खोलीला लागून असलेल्या हॉलमध्ये त्यांचा मृतदेह जमिनीवर गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. मृतदेहाची अवस्था पाहून लोकांनी हत्येचा संशय व्यक्त केला आहे.

या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी सदर पोलीस ठाण्यात दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास केला. महिमा ही दोन वर्षांपासून अतरदह प्रजापती नगर येथील विनोद गुप्ता यांच्या घरात एकटीच राहत होती.

महिमाच्या नाकातून आणि कानातून रक्त येत असल्याचे सांगण्यात येत आहे. दोन्ही पायातील चप्पलही उघडी होती. खोलीत तिचा स्वीच ऑफ केलेला मोबाईल आढळून आला. पोलिसांनी तो जप्त केला आहे.

पोलीस या हत्येचा तपास करत आहेत रात्री उशिरा एएसपी नगर यांच्या सूचनेनुसार फॉरेन्सिक सायन्स लॅब आणि श्वान पथकाने घटनास्थळी पोहोचून तपास केला. खोल्यांमधून पुरावे गोळा करण्यात आले. रक्ताचे नमुने आणि काही बोटांचे ठसे घेण्यात आले.

पोलिसांना चोरी किंवा दरोड्याचे पुरावे मिळाले. रात्री उशिरा महिलेचे कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी एसकेएमसीएचमध्ये पाठवला. शहर एसपी अवधेश दीक्षित यांनी सांगितले की, सहायक अभियंता तिच्या खोलीत बेशुद्ध अवस्थेत पडून असल्याची माहिती मिळाली.

पोलीस घटनास्थळी पोहोचले असता ती मृतावस्थेत आढळून आली. प्रत्येक ठिकाणी पोलीस तपास करत आहेत. शवविच्छेदन आणि एफएसएल तपासणी अहवालातून मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!