Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

हैदराबादमध्ये लग्नाला नकार दिल्याने महिलेने केले टीव्ही अँकरचे अपहरण

Spread the love

हैदराबादमध्ये एक विचित्र घटना घडली आहे. एका व्यावसायिक महिलेने एका टीव्ही अँकर मुलाने लग्न करण्यास नकार दिल्यानंतर त्याचा पाठलाग करून त्याचे अपहरण केले. टीव्ही अँकर मुलगा कुठे जातो याचा मागोवा घेण्यासाठी महिलेने त्याच्या कारमध्ये ट्रॅकिंग डिव्हाइस बसवले होते, असेही समोर आले आहे.

अपहरण केल्यानंतर माझे फोन कॉल उचलावे लागतील, असे मुलाकडून कबूल करून घेतल्यानंतरच त्याची सुटका केली आहे. या गुन्ह्यासाठी पोलिसांनी आता सदर व्यावसायिक महिलेला आणि तिच्या साथीदारांना अटक केली आहे.

काय आहे प्रकरण ?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डिजिटल मार्केटिंगचा व्यवसाय करणाऱ्या ३१ वर्षीय महिलेने लग्नासाठी मॅट्रिमोनिअल साइटवर नोंदणी केली होती. तिथे एका मुलाचा प्रोफाईल तिला आवडले. दोन वर्षांपूर्वी दोघांमध्ये चॅटिंग सुरू झाले.

मात्र कालांतराने महिलेला संबंधित मुलाचे सत्य समजले. त्याने स्वतःच्या फोटोऐवजी एका टीव्ही अँकर मुलाचा फोटो प्रोफाईलला जोडला होता. त्या फोटोला पाहून महिलेची दिशाभूल झाली.

फोटो पाहून प्रेमात पडलेल्या महिलेने यानंतर संबंधित टीव्ही अँकरचा शोध घेतला आणि त्याचा नंबर मिळवला. सदर मुलाला संपर्क साधल्यानंतर महिलेने त्याला त्याच्या फोटोचा गैरवापर झाल्याची माहिती दिली.

तसेच त्याने सायबर क्राइम पोलिसांना याबाबत तक्रार द्यावी, असेही सांगितले. या मुद्द्याने दोघांचे संभाषण सुरू झाले. त्यानंतर महिलेने मुलाला मेसेज पाठविणे सुरूच ठेवले. त्यामुळे काही दिवसांनी मुलाने महिलेचा नंबर ब्लॉक केला.

फोटो पाहून टीव्ही अँकरशी लग्न करण्याचा निश्चय केलेल्या महिलेने त्याचे अपहरण करण्याचा निर्णय घेतला. यासाठी चार लोकांना पैसे देऊन हे कृत्य तडीस न्यायला सांगितले. ११ फेब्रुवारी रोजी चार गुंडांनी पीडित टीव्ही अँकरचे अपहरण केले आणि त्याला सदर महिलेच्या कार्यालयात आणून मारहाण केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.

जीव वाचविण्यासाठी पीडित मुलाने महिलेची मागणी मान्य केली, यापुढे तो तिच्या कॉलला प्रतिसाद देईल, असेही सांगितले. तेव्हाच त्याला कार्यालयातून जाण्याची परवानगी दिली.

कार्यालयातून कशीबशी सोडवणूक करून घेतल्यानंतर पीडित मुलाने हैदराबादच्या उप्पल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. भारतीय दंड विधान कायद्याच्या कलम ३६३ (अपहरण), ३४१ आणि ३४२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपी महिला आणि चार गुंडांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास अद्याप सुरू आहे.

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!