Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवारांचाच, त्यांनी बंडखोरी केली असे म्हणता येणार नाही…

Spread the love

राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणात निकाल देताना राहुल नार्वेकर म्हणाले की, विधिमंडळ पक्षातील बहुमत कोणाचे, हा एकमेव महत्त्वाचा निकष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजित पवार यांचाच आहे, असे राहुल नार्वेकर यांनी निकाल देताना सांगितले. त्यामुळे शरद पवार विरुद्ध अजित पवार ही पक्षाची लढाई अजितदादांनी जिंकली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा आहे हे, ठरवताना विधिमंडळ बहुमाताचा विचार करावा लागला आहे. दरम्यान, 53 पैकी 41 आमदार अजित पवार यांच्याकडे आहे. हे बहुमत शरद पवार गटाने नाकारले आहे.

काय म्हणाले राहुल नार्वेकर ?

मी माझे मत मांडण्यास सुरुवात करत आहे. या पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही. मात्र तो गट तयार झालेले आहेत. प्राथमिक स्तरावर मी पक्षीय रचना, घटना व विधीमंडळ बळ या त्रिसूत्री वर मत नोंदवत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसची घटना सर्वात महत्त्वाची आहे. दोन्ही गट त्याला बांधिल आहेत. 30 जून 2023 ला या पक्षात फूट पडली असून अशावेळी नेतृत्त्वाबाबत पक्षाची घटना काय सांगते हे महत्त्वाचे आहे.

शिवसेना संदर्भात मी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी द्यावा लागेल. राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष पदावर दोघांकडून दावा केला जात आहे. दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष निवड झाली नसल्याचा दावा केला जात आहे. दोन समांतर नेतृत्व याठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

अध्यक्षपदाची निवड घटनेला धरुन नाही, असा दावा दोन्ही गटाकडून कऱण्यात आला. 29 जून 2023 पर्यंत शरद पवार यांच्या अध्यक्षपदाला आव्हान नव्हते. पण 30 जून 2023 रोजी दोन जणांकडून अध्यक्ष असल्याचा दावा करण्यात आला.

आपला अध्यक्ष कसा योग्य हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूंनी पुरावे देण्यात आले. दोन्ही गटांकडून समांतर दावे करण्यात आले. दरम्यान, शरद पवार गटाकडून प्रतिनिधिंच्या निवडणुकीचे पुरावे सादर करण्यात आले नाहीत. पक्षाचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही.

पवार गटाने बंडखोरी केली असे म्हणता येणार नाही

शिवसेना संदर्भात मी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी द्यावा लागेल. राष्ट्रवादी पक्षात अध्यक्ष पदावर दोघांकडून दावा केला जात आहे. दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष निवड झाली नसल्याचा दावा केला जात आहे. दोन समांतर नेतृत्व याठिकाणी उभे राहिले आहेत. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

एनसीपी वर्किंग कमिटी ही पक्षाच्या घटनेप्रमाणे सर्वोच्च यंत्रणा आहे. त्यात १६ कायमस्वरूपी सदस्य आहेत. मात्र पक्षाची घटना कायमस्वरूपी सदस्यांना परवानगी देत नाही. नेतृत्व रचना, पक्षीय घटना आणि विधीमंडळ बळ पाहून पक्ष कुणाचा हे ठरवावे लागेल.यामध्यो पक्षीय घटना व नेतृत्व रचनेत सुस्पष्टता नाही.

विधीमंडळ सदस्यांची संख्या पाहता अजित पवार गटाकडे 41 आमदारांचे पाठबळ आहे. त्यामुळे अजित पवार यांना विधीमंडळ गटाचा पाठिंबा दिसून येतो. राष्ट्रीय कार्यकारणीने निवडल्याने अजित पवारांचा गट हीच खरी राष्ट्रवादी असल्याचे त्यांनी सांगितले.

अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र असून सर्व याचिका डिसमिस करण्यात आल्या आहेत. नवनवीन पक्षांसोबत व विचारसरणी सोबत हल्ली युती व आघाडी होताना आपण पाहत आहोत. पण त्याचा अर्थ प्रत्येक घटनेवर दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही.

अजित पवार व शरद पवार या दोन गटांतील हा पक्षांतर्गत वाद आहे. त्यामुळे कुणीही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार गटाने बंडखोरी केली किंवा पक्ष नेतृत्त्वाविरोधात काम केले असे म्हणता येणार नाही. शरद पवार गटाच्या तिन्ही याचिका फेटाळल्या असून अजित पवार गटाच्या याचिकाही फेटाळण्यात आल्या आहे त्यामुळे कुणीही अपात्र नाही.

 

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!