Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

अखेर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा भाजपमध्ये प्रवेश

Spread the love

राज्यात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आधी मिलिंद देवरा, नंतर बाबा सिद्दीकी आणि आता काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सोमवार काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अशोक चव्हाण यांच्यासोबत माजी आमदार अमर राजूरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दरम्यान, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिला

अशोक चव्हाण यांनी काल (१२ फेब्रुवारी) आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केला आहे. त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचीही भेट घेऊन चर्चा केली. त्यामुळे अशोक चव्हाण भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू झाली होती.

त्यांनी काल आपल्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अशोक चव्हाण यांचा राजकीय इतिहास काही घोटाळ्यांनी भरलेला आहे. चव्हाण यांनी पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व सोडल्याच्या वृत्तानंतर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी हेच संकेत दिले होते.

अशोक चव्हाण आणि आदर्श घोटाळा

26/11 च्या हल्ल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना राजीनामा द्यावा लागला. तेव्हा काँग्रेसमध्ये असलेल्या नारायण राणेंना मुख्यमंत्रिपदाची आकांक्षा होती. मात्र, आमदारपदाची कारकीर्द आणि निष्ठावंतात होणारी गणती या गोष्टी पाहता अशोक चव्हाणांची मुख्यमंत्रिपदावर निवड झाली.

त्यानंतर 2009 च्या विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आणि ही निवडणूक अशोक चव्हाणांच्या नेतृत्वातच काँग्रेस महाराष्ट्रात लढली. राष्ट्रवादीच्या मदतीने काँग्रेस पुन्हा सत्तेत आली आणि मुख्यमंत्रिपदाचीही दावेदार बनली.

अशोक चव्हाणांनी राजीनामा दिल्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाले. 2014 च्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची पडझड झाली. त्यातही अशोक चव्हाण आणि राजीव सातव हे दोनच खासदार महाराष्ट्रातून निवडून आले. तत्कालीन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरेही काँग्रेसला या पडझडीतून वाचवू शकले नाहीत. तेव्हा अशोक चव्हाणांना प्रदेशाध्यक्ष करण्यात आले.

महाराष्ट्र सरकारने युद्धात शहीद झालेले सैनिक आणि संरक्षण मंत्रालयाच्या कर्मचाऱ्यांसाठी मुंबईतील कुलाबा येथे १३ मजली इमारत बांधण्याचा निर्णय घेतला होता. जी कुलाबा येथे आदर्श गृहनिर्माण संस्थेच्या नावाने बांधण्यात आली होती.

त्याचे बांधकाम झाल्यानंतर या सोसायटीमध्ये लष्कराशी संबंधित नसलेल्या अधिकारी आणि राजकारण्यांना हे फ्लॅट्स अत्यंत कमी किमतीत दिल्याचे आरटीआयमध्ये उघड झाले आहे. हा घोटाळा 2010 मध्ये उघडकीस आला होता.

या सोसायटीत महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचेही तीन फ्लॅट्स होते आल्याने त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी दोन सदस्यीय न्यायिक आयोग स्थापन केला.

त्यानंतर १८२ साक्षीदारांना वगळल्यानंतर आयोगाने अंतिम अहवाल एप्रिल २०१३मध्ये महाराष्ट्र सरकारला सादर केला. या अहवालात प्रॉक्सीद्वारे तयार केलेल्या २२ खरेद्यांसह २५ बेकायदेशीर वाटपांची सविस्तर माहिती प्रकाशित केली.

अहवालात महाराष्ट्रातील चार माजी मुख्यमंत्र्यांचाही समावेश होता; अशोक चव्हाण, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे आणि शिवाजीराव निलंगेकर पाटील, माजी नागरी विकास मंत्री राजेश टोपे, सुनील तटकरे आणि विविध १२ अनधिकृत व्यक्तीसह १२ सर्वोच्च अधिकारी आणि वाटपदारांमध्ये देवयानी खोब्रागडे यांचा समावेश होता.

केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय), आयकर विभाग आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) सध्या या घोटाळ्यामध्ये महाराष्ट्रातील तीन माजी मुख्यमंत्री – सुशीलकुमार शिंदे, विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे.

अशोक चव्हाण यांची राजकीय कारकीर्द

अशोक चव्हाण पुणे विद्यापीठात शिकत असताना विद्यार्थी प्रतिनिधी झाले. त्यावेळी अशोक चव्हाण यांच्यात नेतृत्वगुण विकसित झाले. यावेळी अशोक चव्हाण युवकांना एकत्र करण्यात यशस्वी ठरले. 1995 ते 1999 या काळात त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या.

काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली. नंतर ते 2014 ते 2019 या काळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष झाले. अशोक चव्हाण हे ऑगस्ट २०२३ पासून आजपर्यंत काँग्रेस कार्यकारिणीचे सदस्य होते.

अशोक चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रमुख नेते म्हणून ओळखले जातात. त्यांचे वडील शंकरराव चव्हाण हे देखील दोन वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. अशोक चव्हाण 1987 मध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा संसदेत पोहोचले. यानंतर 1992 मध्ये ते विधान परिषदेचे सदस्य झाले. 1995 ते 1999 या काळात ते महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस होते.

त्यानंतर 2003 मध्ये ते विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये मंत्री होते. 2008 मध्ये विलासराव देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर ते मुख्यमंत्री झाले. मात्र पुढे त्यांचे नाव आदर्श घोटाळ्यात आल्यामुळे त्यांना 2010 मध्ये मुख्यमंत्रीपद गमवावे लागले होते. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी लोकसभा निवडणूक जिंकली. 2015 मध्ये ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही होते.

1987-1989 दरम्यान अशोक चव्हाण यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. ते जिंकले. 1992 मध्ये ते महाराष्ट्र विधान परिषदेत आमदार म्हणून निवडून आले. ते 1993 मध्ये सार्वजनिक बांधकाम, नगरविकास आणि गृहराज्यमंत्री म्हणून सरकारमध्ये सामील झाले.

2003 मध्ये अशोक चव्हाण यांच्याकडे विलासराव देशमुख यांच्या सरकारमध्ये परिवहन, बंदरे, सांस्कृतिक कार्य आणि प्रोटोकॉल मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. 8 डिसेंबर 2008 ते 9 नोव्हेंबर 2010 पर्यंत त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहिले.

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!