Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MarathaAndolanNewsUpdate : मराठा आंदोलनावर मुख्यमंत्र्यांची वर्षा बंगल्यावर तातडीची बैठक

Spread the love

मुंबई : मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या प्रमुख मागण्यांपैकी सर्वात महत्वाची मागणी असलेल्या सगसोयऱ्यांवर आजच निर्णय होण्याची शक्यता असून सगेसोयऱ्यांच्या नोंदी करण्यासंदर्भातील अद्यादेश आजच काढला जाणार असल्याचे वृत्त आहे. दरम्यान मराठा जमाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार सरकारकडून नवा अध्यादेश तयार करण्याबाबतची बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या वर्षा या निवासस्थानी पार पडली. ही बैठक तब्बल साडे तीन तास चालली असल्याचे सांगण्यात येत आहे.

या बैठकीला मुंबईचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगरांचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा आणि मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे आदी उपस्थित होते. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड विशेष विमानाने मनोज पाटील जरांगे यांना जीआर संदर्भात बोलण्यासाठी मुंबईमध्ये बोलावण्यात आले आहे. या बैठकीतील चर्चेनंतर जरांगे पाटील यांच्या मागणीप्रमाणे नवीन अध्यादेश लवकरच जरांगे पाटील यांच्यापर्यंत पोहचवण्याच्या दृष्टीने सरकारची तयारी चालू असल्याचे सांगण्यात येत आहे. उद्या १२ वाजण्याच्या आत सरकारने आपल्या मागणीवर निर्णय दिला नाही तर आरक्षण घेतल्याशिवाय मुंबईत परत न जाता आझाद मैदानावर जाणार असल्याचा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.

मनोज जरांगे यांच्या मागण्या …

1. नोंद सापडणाऱ्यांच्या सोयऱ्यांनाही सरसकट प्रमाणपत्र द्या
2. मोफत शपथपत्र घेऊनच सोयऱ्यांना प्रमाणपत्र द्या
3. कोर्टात आरक्षण मिळेपर्यंत मुला-मुलींना १०० टक्के शिक्षण मोफत करा
4. जिल्हास्तरावर वसतिगृह बांधा
5. आरक्षण मिळेपर्यंत सरकारी भरती करु नका, केल्यास मराठा आरक्षणाच्या जागा राखीव ठेवा
6. आंतरवालीसह राज्यातील सर्व मराठा आंदोलकांवरील गुन्हे घ्या
7. एसईबीसी अंतर्गत २०१४ च्या नियुक्त्या त्वरित द्या
8. वर्ग १ व २आणि पोलीस उपनिरीक्षक पदाच्या नियुक्त्या द्या

आपलं सरकार

Click to listen highlighted text!