Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

BiharPoliticalUpdate : बिहारमध्ये राजकीय उलथा पालथीचे संकेत , सीएम नितीश कुमार एनडीएमध्ये परतणार असल्याची चर्चेला उधाण …

Spread the love

नवी दिल्ली : बिहारमध्ये सत्तेबाबत पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार एनडीएमध्ये परतणार असल्याची चर्चा आहे. बिहारमध्ये पुन्हा एकदा एनडीए आघाडीचे सरकार स्थापन असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे केवळ आरजेडी आणि जेडीयूचे मार्गच वेगळे होताना दिसत नाहीत, तर गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात जो दरी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात होती, ती आता कोंडीत बदलताना दिसत आहे. मात्र या चर्चेवरून नितीश आणि लालू यांच्या दोन्ही छावणीत शांतता आहे आणि कोणाकडूनही अधिकृत उत्तर देण्यात येत नाही. त्य़ातच, आता काँग्रेसचेही १० आमदार भाजपाच्या संपर्कात असल्याचे वृत्त माध्यमांत झळकत आहे. 

दरम्यान, अशी बातमी आहे की, आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांना फोन केला असता त्यांनी फोन उचलला नाही. शुक्रवारी संध्याकाळी लालू यादव यांनी नितीश यांना फोन केला मात्र ते फोनवर आले नाहीत, असे सूत्रांचे म्हणणे आहे. २०१७ मध्ये जेव्हा नितीश कुमार महाआघाडीपासून वेगळे झाले होते तेव्हा नितीश कुमार यांनी शेवटच्या क्षणी लालू यादव यांना फोन केला होता. तुमचा पाठिंबा इथपर्यंत होता, आता आम्ही आपली रजा घेतो,  तुझ्यासोबत तुमच्यासोबत काम करताना आनंद वाटला , असे नितीश कुमार म्हणाले होते.”

दुसरीकडे, माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या निवासस्थानी आरजेडी नेत्यांची बैठक बोलावण्यात आली होती जी संपली आहे. तर जेडीयूने २८ जानेवारीला विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे, जी मुख्यमंत्री नितीश यांच्या निवासस्थानी होणार आहे. शुक्रवारी, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राज्यपालांनी आयोजित केलेल्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याने आरजेडी आणि जेडीयूमधील अंतर वाढत असल्याचे दिसून आले. त्यांच्या पक्षातील फक्त एकच नेते आलोक कुमार मेहता  आले होते  आणि मध्येच परत गेले.

तेजस्वीसह हे राजद नेते बेपत्ता आहेत

दरम्यान तेजस्वी यादव यांच्या गैरहजेरीबाबत नितीश कुमार यांना विचारले असता ते पत्रकारांना म्हणाले, ‘जे आले नाहीत त्यांनाच विचारा.’ राजभवनात एका खुर्चीवर तेजस्वी यादव यांच्या नावाची स्लिप लावण्यात आली, ती नंतर काढून टाकण्यात आली.  त्यावर नंतर जेडीयू नेते अशोक कुमार चौधरी त्यावर बसले. या बैठकीत मुख्यमंत्री नितीश हे विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करताना दिसले. विधानसभेचे अध्यक्ष अवध बिहारी चौधरीही बैठकीला उपस्थित राहिले नाहीत. प्रजासत्ताक दिनानिमित्त राजभवनात अल्पोपाहार आयोजित करण्याची परंपरा असून, सत्ताधारी पक्षाचे नेते अशा पद्धतीने गैरहजर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.

नितीश कुमार एनडीएमध्ये परतणार ?

त्याचवेळी एक बातमी अशीही येत आहे की, भाजप आमदारांनी नितीश यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारण्यास सहमती दर्शवली आहे. नितीश कुमार यांच्या स्वागतासाठी भाजप आमदार राजू सिंह सज्ज झाले आहेत. त्यांनी नितीशकुमार यांचे कौतुक केले आहे. हा खेळ खेळण्यापूर्वीच भाजप आमदारांनी सीएम नितीश यांचे कौतुक करण्यास सुरुवात केली आहे. सर्वोच्च नेतृत्वाने त्यांना मुख्यमंत्री केले तर ते आम्ही स्वीकारू, असे त्यांनी म्हटले आहे.

जेडीयूच्या सूत्रांनी माध्यमांना सांगितले की, नितीश कुमार काँग्रेसवर नाराज आहेत. नितीश कुमार यांना इंडिया ब्लॉक संयोजक पद न देणे हे अपमानास्पद कृत्य होते. जागावाटपाच्या कराराला झालेला विलंब आणि समन्वयकपदाचा निर्णय न झाल्याने नितीश कुमार काँग्रेसवर नाराज असल्याचे बोलले जात आहे. जेडीयू १७ (१६+१) लोकसभेच्या जागा आणि इंडिया ब्लॉकच्या समन्वयक पदावर लक्ष ठेवत होता. त्याचवेळी भाजपने शनिवारी दुपारी ४ वाजता पाटण्यात सर्व खासदार आणि आमदारांची बैठक बोलावली आहे. भाजपच्या वरिष्ठ सूत्रांनी सांगितले की, केंद्रीय नेतृत्वाने बिहार राज्य युनिटला बिहारमध्ये सरकार स्थापनेचा फॉर्म्युला प्रस्तावित करण्याची घाई करू नये असे सांगितले आहे.

भाजपात दोन गट

दरम्यान, नितीश कुमारांच्या जेडीयूने भाजपसोबत जाण्याची पूर्णपणे तयारी केली आहे. मात्र नितीश कुमारांना पुन्हा मुख्यमंत्रिपद देण्यावरून भाजपमध्ये दोन गट पडले आहेत. नितीश कुमारांना मुख्यमंत्री दिलं तर आपल्या हक्काच्या मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होईल, अशी भीती भाजपला वाटत आहे. त्यातूनच नितीश कुमारांच्या एनडीएतील घरवापसीची घोषणा रखडली आहे.

शनिवारपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर निर्णय होण्याची शक्यता आहे. बिहार भाजपचे प्रभारी विनोद तावडे उद्या सकाळी बिहारमध्ये पोहोचत आहेत. लालू यादव आता ‘आर या पार’च्या मूडमध्ये दिसत आहेत. लालू यादव यांना नितीशकुमारांकडून स्पष्टता हवी आहे. नितीशकुमार यांनी सायंकाळपर्यंत शंका दूर कराव्यात. आरजेडी नेते मनोज झा यांच्या माध्यमातून नितीश यांच्यासाठी आवाहन करण्यात आले आहे. सध्या नितीश आणि लालू-तेजस्वी यांच्यातील चर्चा थांबली आहे, त्यामुळेच माध्यमांतून आवाहन करण्यात आले.

लालू प्रसाद यादव यांचेही प्रयत्न

पुत्र तेजस्वी यादव यांना बिहारचे मुख्यमंत्री करण्यासाठी लालू प्रसाद यादव हेही आपली सर्व शक्ती पणाला लावत आहेत. बहुमताचा जादुई आकडा गाठण्यासाठी आरजेडीलाही अवघ्या काही आमदारांची आवश्यकता आहे. एमआयएम, हम पार्टी यांच्या मदतीने लालू प्रसाद यादव यांनी हा आकडा १२० वर नेला असून त्यांना आता केवळ दोन आमदारांची गरज भासणार आहे. त्यासाठी जेडीयूला फोडण्याचेही लालू प्रसाद यादव प्रयत्न करत असल्याची चर्चा बिहारच्या राजकीय वर्तुळात रंगत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!