Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

टक्केवारीच्या विषयावरून मंत्री अब्दुल सत्तार – खा. हेमंत पाटील यांची एकमेकांना शिवीगाळ , प्रशासनाने केला माईक बंद !!

Spread the love

हिंगोली : हिंगोली जिल्हा नियोजन समितीच्या ऑनलाईन बैठकीत बैठक आज पार पडली. या बैठकीत खासदार हेमंत पाटील यांनी निधीवाटप करताना टक्केवारीचं शेण खाल्लं, असा आरोप करताच पालकमंत्री अब्दुल सत्तार यांचा पारा चढला आणि दोघांनीही एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यास सुरुवात केली. दरम्यान दोघांमधील हे भांडण इतके विकोपाला गेले की थेट शिवीगाळ सुरु झाली तेंव्हा प्रशासनाकडून खासदार पाटील यांचा माईक म्यूट करून बैठक सुरू ठेवण्याची नामुष्की आली.

हिंगोली जिल्हा नियोजन समितीची ऑनलाईन बैठक आज पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली.या बैठकीला खासदार हेमंत पाटील, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे यांचीही उपस्थिती होती. तर जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, प्रभारी जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव हे अधिकारीही उपस्थित होते.

जिल्हा नियोजन समितीची बैठक प्रत्यक्ष स्वरूपात घेण्याचे ठरलेले असताना पालकमंत्री सत्तार यांनी अचानकपणे आपला प्रवास दौरा रद्द करत ही बैठक ऑनलाईन घेण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या होत्या. बैठकीच्या सुरूवातीलाच निधी वाटपातील भेदभावावरून खासदार हेमंत पाटील यांनी आक्रमक रूप धारण करून पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधातील आपला सूर आवळला तेंव्हा टक्केवारीच्या आरोप होताच मंत्री अब्दुल सत्तार चांगलेच खवळले त्याला खा. हेमंत पाटील यांनीही जशास तसे उत्तर दिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!