देवेंद्र फडणवीस हे स्वार्थी, संधीसाधू तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे चाटूगिरी करणारे : खा. विनायक राऊत, काळाराम मंदिराचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे करणार प्रचाराला प्रारंभ !!

Advertisements
Advertisements
Spread the love

नाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर येत्या २३ तारखेला, बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त नाशिकमधील जाहीर सभेतून उद्धव ठाकरे लोकसभेच्या प्रचाराचे रणशिंग फुंकणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली. देवेंद्र फडणवीस हे स्वार्थी, संधीसाधू आहेत, त्यांना सत्तेची लालसा आहे, त्याच्याकडून काय अपेक्षा करणार? तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वार्थासाठी कोणाचीही चाटूगिरी करणारे आहेत अशी टीकाही त्यांनी केली.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा २३ जानेवारीला जन्मदिवस आहे. त्यादिवशी संध्याकाळी उद्धव ठाकरे नाशिकमध्ये जाहीर सभा घेतील आणि लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ करतील अशी माहिती विनायक राऊत यांनी दिली. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे हे २२ जानेवारी रोजी नाशिकमध्ये जाऊन काळाराम मंदिरात रामाचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ७ वजाता गोदावरी तीरावर आरती करतील. २३ तारखेला ‘दार उघड बये दार उघड’ असा जगदंबाची आराधना करणार आहेत.

Advertisements

विनायक राऊत म्हणाले की, राम हे दैवत आहे, रामाची पूजा करताना राजकारण नको असे खासदार विनायक राऊत म्हणाले. अयोध्येत राम मंदिर झाले पाहिजे ही भूमिका बाळासाहेब ठाकरे यांनी घेतली होती. आता अयोध्येतील मंदिर अर्धवट आहे, मंदिराचे पूर्ण बांधकाम झालेलं नाही, तरीही निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन लोकार्पण करत आहेत. हिंदू धर्मात पौष महिन्यांत शुभ कार्य करत नाहीत. मात्र निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राम मंदिराचे लोकार्पण केले जात आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!