Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

गँगस्टर शरद मोहोळ हत्या प्रकरणात ८ जणांना अटक , दोन वकिलांचाही समावेश , १० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी

Spread the love

पुणे : कुख्यात गँगस्टर शरद मोहोळची दिवसाढवळ्या निर्घृण हत्या झाल्यानंतर पुणे पोलिसांनी आतापर्यंत ८ आरोपींना अटक करण्यात आली. अटकेतील आरोपींमध्ये दोन वकिलांचा सुद्धा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. शरद मोहोळ हत्या प्रकरणात मुख्य आरोपीसह ६ आरोपींना १० जानेवारीपर्यंत तर २ वकिलांना मात्र केवळ ३ दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.

काल गोळ्या घालून शरद मोहोळची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी सर्व आरोपींना काल रात्री अटक केली होती. आज कोर्टात जोरदार युक्तिवाद देखील करण्यात आला. या सहा आरोपींचा वकीलपत्र आम्ही घेतले होते म्हणून आम्हाला अटक करण्यात आली.

शरद मोहोळची पत्नी भाजपमध्ये…

किशोर मारणे हा गणेश मारणेचा जवळचा सहकारी होता. पौड रोडवर ४ ऑक्टोबर २००६ रोजी गुंड संदीप मोहोळच्या हत्येप्रकरणी मुख्य आरोपी होता. गणेशला अटक झाल्यानंतर किशोरने टोळी चालवण्यास सुरुवात केली, पण किशोरला शरद मोहोळने संपवल्याचा आरोप आहे. शरद मोहोळची पत्नी स्वातीने भारतीय जनता पक्षात (भाजप) प्रवेश केला आहे. शहरातील अनेक सामाजिक उपक्रमांमध्ये हे जोडपे दिसले होते. कोथरूडमधील स्वरद फाउंडेशनच्या अध्यक्षा स्वाती मोहोळ यांनी चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला होता.

शरद मोहोळ हा सुमारे १५ गंभीर गुन्ह्यांमध्ये अट्टल दहशतवादी गुंड म्हणून ओळखला जातो. मोहोळ आणि त्याचा म्होरक्या आलोक भालेराव यांच्यावर जून २०१२ मध्ये इंडियन मुजाहिद्दीनचा संशयित सदस्य आणि दहशतवादी खटल्यातील संशयित कतील सिद्दीकी याचा येरवडा तुरुंगात गळा दाबून खून केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. मात्र मोहोळ आणि भालेराव या दोघांचीही जून २०१९ मध्ये पुण्यातील न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. जानेवारी २०१० मध्ये गुंड किशोर मारणेच्या हत्येप्रकरणी शरद मोहोळचेही नाव होते. दत्तवाडी पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या या खून प्रकरणात न्यायालयाने त्याला व त्याच्या सहा साथीदारांना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. मात्र या शिक्षेविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यानंतर २०२१ मध्ये उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. याशिवाय २०११ मध्ये पौड पोलिस ठाण्यात दाखल झालेल्या अपहरण, खंडणी आणि खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी मोहोळ आणि इतर सात जणांची पुणे सत्र न्यायालयाने नुकतीच निर्दोष मुक्तता केली.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!